Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पुण्यात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 1658 नवे पॉझिटिव्ह तर 35 जणांचा मृत्यू




पुणे ➡️  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 1658 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुणे शहरातील 35 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 14 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 2267 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1502 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.. सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 94, 497 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 76, 686 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 15, 544 एवढी आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 833 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी तब्बल 507 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

Print Friendly and PDF



Post a Comment

0 Comments