Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्ह्यात 72 बाधितांची भर, कोरोनातून 21 व्यक्ती बरे तर एकाचा मृत्य





नांदेड, दि. 26 जुलै:- जिल्ह्यात आज 26  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 72 व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर 21 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रविवार 26 जुलै रोजी भोकर येथील 50 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 57 एवढी झाली आहे. 
        आज बरे झालेल्या 21 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 5, बिलोली कोविड केअर सेंटर मधील 2, कंधार कोविड केअर सेंटर मधील 2, मुखेड कोविड केअर सेंटर मधील 2, नायगाव कोविड केअर सेंटर मधील 5, गोकुंदा कोविड केअर सेंटर मधील 1 व खाजगी रुग्णालयातील 4 बाधितांचा  यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 693 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 243 अहवालापैकी 161 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 324 एवढी झाली असून यातील 693 एवढे बाधित बरे झाले आहेत. 562 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.  
    नवीन 72 बाधितांमध्ये  पंचायत समिती परिसर नांदेड 85 वर्षाचा 1 पुरुष, इतवारा येथील 65 वर्षाची 1 महिला, काबरानगर नांदेड येथील 19 वर्षाचा 1 पुरुष, शिवशक्ती नांदेड येथील 10 बाधित यात अनुक्रमे 3,7,25,30,52 वय वर्षाचे 5 पुरुष तर अनुक्रमे 12,25,29,42,48 वय वर्षाच्या 5 महिला, एसपी ऑफीस परिसर 60 वर्षाची 1 महिला, पाठक गल्ली येथील अनुक्रमे 7,24,28 वय वर्षाचे 3 पुरुष, कलामंदीर नांदेड येथील 26 वर्षाचा 1 पुरुष, बाबानगर नांदेड येथील 34 आणि 36 वर्षाचे 2 पुरुष, एमजीएम कॉलेज परिसर येथील 32 वर्षाची 1 महिला, आशिर्वाद गार्डन परिसरातील 37 वर्षाचा 1 पुरुष, मीलगेट येथील 59 वर्षाचा 1 पुरुष, महाविर सोसायटी नांदेड येथील 30 वर्षाचा 1 पुरुष, जुना कौठा येथील 30 व 34 वर्षाचे 2 पुरुष तर 53 वर्षाची 1 महिला, हडको नांदेड येथील 73 वर्षाचा 1 पुरुष व 45 वर्षाची 1 महिला, सिडको नांदेड येथील 68 वर्षाचा 1 पुरुष, चौफाळा नांदेड येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, सगरोळी बिलोली येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, मोहमंद नगर भोकर येथील 50 वर्षाची 1 महिला, हदगाव येथील 38 वर्षाचा 1पुरुष व 35 वर्षाची 1 महिला, तामसा येथील 18,27,28,33 वय वर्षाचे 4 पुरुष, शारदानगर देगलूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, 40 वर्षाची 1 महिला, मुछी गल्ली देगलूर येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, रफिक कॉलनी येथील 53 वर्षाची 1 महिला, सत्यमनगर देगलूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, हत्तीपुरा कंधार येथील 65 वर्षाची 1 महिला, नायगाव येथील 72 वर्षाची 1 महिला, कोलंबी येथील 35 वर्षाची 1 महिला, धर्माबाद येथील 36 वर्षाचा 1 पुरुष, 20 व 54 वर्षाचे 2 पुरुष, फुलेनगर मुखेड येथील 8 वर्षाचा एक मुलगा व 25 वर्षाची 1 महिला, 15 व 35 वर्षाचे 2 पुरुष, अनुक्रमे 12,28,55 वर्षाच्या 3 महिला, 70 वर्षाचा 1 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, अंबुलगा येथील 32 व 39 वर्षाच्या 2 महिला, वडगाव येथील 22 वर्षाचा 1 पुरुष व 41 वर्षाची 1 महिला, जहूर येथील 5,7,25 वय वर्षाच्या 2 महिला, संतगाडगेबाबानगर येथील 60 वर्षाची 1 महिला, खरबखेड येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, परभणी जिल्ह्यातील बरबडी येथील 80 वर्षाचा 1 पुरुष, गंगाखेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष हे सर्व आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे बिके हॉल श्रीनगर नांदेड येथील 16 व 47 वर्षाचे 2 पुरुष बाधित आढळले.



Post a Comment

0 Comments