Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात रविवारी 38 कोरोनाबाधितांची भर, दोघांचा मृत्यू तर 06 रुग्ण कोरोनामुक्त




परभणी, दि. 26 जुलै:- जिल्ह्यात रविवारी सांयकाळी 07 वाजेपर्यंत एकूण 38 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहे. यात गंगाखेड शहरात रॅपीड अॅन्टीजन टेस्ट मध्ये 04 आणि आरटी-पीसीआर मध्ये 15 असे 19 रुग्ण हे पाॅझिटिव्ह निघाले रुग्णांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 06 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. जिल्हयात एकूण मृत्यू पावले रुग्णांची संख्या 23 झाली आहे.
06 कोरोनमुक्त रुग्णांची माहिती:- परभणी शहर गालिब नगर येथील 31 वर्षीय पुरुष, शाही मस्जिद जवळ 42 वर्षीय पुरुष, सरर्फराज नगर येथे 12 व 08 वर्षीय महिला, वकील काॅलनी येथे 52 वर्षीय महिला, पाथरी शहरातील जवाहर काॅलनी येथे 28 वर्षीय पुरुष असे तीन महिला व तीन पुरुष आज कोरोना मुक्त झाले आहे.
19 कोरोना रुग्णांची माहिती:- परभणी शहरातील अपना काॅर्नर येथे 43 वर्षीय पुरुष, साखला प्लाॅट येथे 46 वर्षीय पुरुष, गुलजार काॅर्नर येथे 38 वर्षीय पुरुष, देशमुख गल्ली येथे 63 वर्षीय पुरुष, संत तुकाराम नगर येथे 28 वर्षीय पुरुष, मोठा मारुती मंदिर परिसर 65 वर्षीय महिला, नानलपेठ येथे 70 वर्षीय महिला, राजेंद्र गिरी नगर येथे 55 वर्षीय महिला, वजीराबाद गणेश नगर येथे 52 वर्षीय महिला असे एकूण 09, सेलू शहरातील मारोती नगर 33 वर्षीय महिला, पुर्णा शहरातील रमाई नगर येथे 30 वर्षीय पुरुष, इकबाल नगर येथे 30 वर्षीय महिला, आंनद नगर येथे 35 वर्षीय महिला आणि 36, 18, 04 वर्षीय पुरुष, जिंतूर शहरातील अर्बन नगर येथे 80 वर्षीय पुरुष, गंगाखेड येथे वेताळ गल्ली येथे 60 वर्षीय पुरुष व बळीराजा काॅलनी येथे 50 वर्षीय पुरुष असे 07 महिला व 12 पुरुष कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. गंगाखेड येथे आरटी-पीसीआर टेस्ट मध्ये 15 आणि अॅन्टीजन रॅपीड टेस्ट मध्ये 04 रुग्णांचा अहवाल हा पाॅझिटिव्ह आला आहे. आज एकूण 19 पाॅझिटिव्ह कोरोना रुग्णांचा भर पडली आहे.
02 कोरोना रुग्णांचा मृत्यू:- परभणी शहरातील मोठा मारुती येथील रहिवाशी 65 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला मृत्यू झाला आहे. या महिलेस जुना दम्याचा त्रास होता आणि देशमुख गल्ली येथे 63 वर्षीय पुरुषांचा मृत्यू आज झाला आहे. या रुग्णाला मधुमेह, फुफुसाचा संसर्ग व धमण्यांचा आजार होता.




Post a Comment

0 Comments