Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ प्रा. गणेश शिंदे यांचे "जीवन सुंदर आहे" या विषयावर व्याख्यान जिंतूरात





जिंतूर ➡️ तालुका प्रेस क्लब व  व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून जिंतूरकरांसाठी पुणे येथील ख्यातनाम व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांच्या" जीवन सुंदर आहे "या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6:00 वाजता जुनी मुन्सफी, भाजी मंडई जिंतूर या ठिकाणी करण्यात आले आहे.




मागील अनेक वर्षापासून तालुका प्रेस क्लब व व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने जिंतूरकरांसाठी साहित्यिक व सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात येते. महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्रा.नामदेवराव जाधव, प्रा अमर हबीब, कवी नारायणपुरी, अरुण पवार, भारुड रत्न स्वर्गीय निरंजन भाकरे, वऱ्हाडकार प्रा अशोक पवार, मुंबई येथील आईकारप्रा. प्रशांत मोरे, जयराम खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या व्याख्यानमालेत हजेरी लावली आहे. 



यावर्षी महाराष्ट्रात आपल्या वक्तृत्वाने समाजमन जागृत करणारे प्रख्यात व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांच्या व्याख्यानेच्या आयोजन दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6:00 वाजता जुनी मुन्सफी, भाजी मंडई जिंतूर या ठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विभागीय पातळीवरील पत्रकारांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे शिवाय सहकार भूषण व उद्योग रत्न पुरस्कार ही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिंतूरकरांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, प्रेस क्लबचे तालुकाध्यक्ष मंचकराव देशमुख, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण यांनी केले आहे.(vnsnews24, feature )









Post a Comment

0 Comments