Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सेवानिवृत्त कृषी सहायक लक्ष्मणराव काळे यांचे निधन; उद्या देहदान




परभणी ➡️ येथील कारेगाव रोडवरील विजयश्री नगरातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव रुखमाजी काळे यांचे  शुक्रवारी दिनांक 30 जून 2023 रोजी संध्याकाळी 7.50 वाजता शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते.(vnsnews24, feature ) 





दरम्यान, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान होणार असून नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उद्या  शनिवारी दिनांक 1 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 7 वाजता त्यांचे  पार्थिव नांदेडसाठी रूग्णवाहिकेद्वारे देहदानांसाठी  नेण्यात येणार आहे. तत्पूर्वी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज रात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत राहत्या घरी संदीप निवास, विजयश्री नगर, हनुमान मंदीराजवळ, कारेगाव रोड, देशमुख हॉटेल मागे, परभणी येथे ठेवले जाणार आहे.



लक्ष्मणराव काळे हे मूळचे कुरुंदा (ता.वसमत जि.हिंगोली) येथील मूळ रहिवासी असून राज्य शासनाच्या सेवेतून सहायक कृषी सहायक या पदावरून 2001 साली निवृत्त झाले होते. तसेच विजयश्री सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 



सामाजिक व धार्मिक कार्यात ते सक्रिय होते. पत्रकार बालासाहेब काळे आणि पिंगळी येथील विवेक वर्धिनी सेवाभावी संचलित डी.फार्मसी कॉलेजचे कर्मचारी संदीप काळे यांचे ते वडील होते.






Post a Comment

0 Comments