Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  कोटपा कायदा : वाशिम येथे १७ पान टपऱ्यांवर कारवाई




वाशिम ➡️ राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय,वाशिम आणि पोलीस स्टेशन,वाशिम यांच्या संयुक्त वतीने आज ४ मे रोजी वाशिम शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा अर्थात कोटपा कायदा २००३ चे उल्लंघन करणाऱ्या १७ पान टपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करुन २९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (vnsnews24, gov) 





कोटपा कायदा अंमलबजावणी पथकाने वाशिम शहरातील जिल्हा रुग्णालय परिसर,बसस्थानक, अकोला नाका येथील पान टपरी धारकांवर व धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई केली. या पथकाने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे यांच्या मार्गदर्शनात कोटपा कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली. 





या कायद्यातील कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, कलम ६ (अ) नुसार १८ वर्षाखालील व्यक्तीला तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी, कलम ६ (ब) नुसार शैक्षणिक संस्थेच्या १०० मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी या नियमाअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. धुम्रपान निषेध निर्देश फलक व १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे.असे निर्देश फलक पान टपरीवर लावण्याच्या सूचना या पथकाने संबंधित पान टपरी चालकांना दिल्या.




जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, ना.पो.कॉ.पवन नप्ते, पो.कॉ.जगदीश महल्ले, रामकिशोर धोटे यांचे या कारवाईसाठी सहकार्य मिळाले.(vnsnews24, gov) 


                   




Post a Comment

0 Comments