Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/तथागत गौतमबुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शांतता रॅलीचे आयोजन 05 मे रोजी





जिंतूर ➡️ भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखाच्या वतिने भगवान तथागत गौतमबुद्ध यांच्या 2567 व्या जयंतीनिमित्त 05 मे रोजी तथागत गौतमबुद्ध यांच्या प्रतिमा सहित जिंतूर शहरामध्ये भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. (vnsnews24, feature ) 





या आयोजित रॅलीत मोठ्या संख्येत महिला-पुरुष, युवक-युवती यांनी आपला शुभ्र पोशाख परिधान करून रॅलीत शामिल व्हावेत अशी विनंती भारतीय बौद्ध महासभा जिंतूर तालुका शाखाचे अध्यक्ष शिवाजी लाटे यांनी केली आहे.





जिंतूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारापासुन सकाळी 08 वाजता भगवान बुद्ध यांच्या प्रतिमा सहित भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या नंतर जिंतूर नगर परिषद कार्यालय परिसर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळी 10 वाजता धम्म ध्वजारोहन व बुद्ध वंदनेचा कार्यक्रम होणार आहे. 





या आयोजित कार्यक्रमात अकोला येथील पुज्यनिय भन्ते विशालकिर्ती यांची मानवी कल्याणासाठी धम्मदेसना व ईजि.भीमराव हटकर यांचा "बौद्ध धम्मा समोरिल आव्हाने" या विषयावर व्याख्यान होणार आहे. या आयोजित कार्यक्रम मध्ये उपासक, उपासिका व बहुजन बांधवानी शुभ्र वस्त्र परिधान करून शांतता रॅलीस उपस्थित रहावे असे आव्हान भारतीय बौद्ध महासभा जिंतूर तालुका शाखाच्या वतिने करण्यात आले आहे. (vnsnews24, feature ) 








Post a Comment

0 Comments