Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तआयोजित मोफत आरोग्य शिबिरात 350 रुग्णांची तपासणी




परभणी ➡️ गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मयोगी  प्राचार्य डॉ. शिवाजीराव विठ्ठलराव दळणार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास प्रारंभ करण्यापूर्वी डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक हराळे,सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. प्रिया दळणर, डॉ. परशुराम शिंदे,आनंद जाधव, मुख्याध्यापक किशन रोडे यांची उपस्थिती होती.(vnsnews24, feature ) 


 




या शिबिरात तीनशे ३०० जणांचा सहभाग होता. होळकर महाविद्यालयात मोफत माधवबाग यांच्याकडून आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात हृदयाचे ठोके, रक्तदाब छातीची पट्टी, वजन तपासणी, शरीर तापमानात तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, वैद्यकीय  विषयक सल्ला देण्यात आला आहे. यात 75 रुग्णांनी रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ८० रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली. यातील काही रुग्णांना पुढील उपचार घ्यावा, असाही सल्ला तज्ञ डॉक्टरांनी यावेळी दिला. उदयगिरी लायन्स क्लब यांच्या वतीने २०० जणांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली आहे. 



यात  55 जणाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. वरील सर्व शिबिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात गुरुवारी दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आले आहे. माधवबाग येथील डॉ.उपेंद्र कुलकर्णी, डॉ. शंकर सुरनर, उदयगिरीचे डॉ.  गायकवाड यांनी काम पाहिले. या शिबिराला राणीसावरगाव परिसरातील व खेड्यापाड्यांतील नागरिकांनी सहभाग घेतला होता.

 

कर्मयोगी शिवाजी दळणर यांचा आदर्श इतरांनी घ्यावा : ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर


मूर्तिकार दगडांना घडवितात त्याच पद्धतीने डॉ. शिवाजीराव विठ्ठलराव दळणर यांनी येथील हजारो तरुणांना घडविण्याचे काम केले आहे, त्यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे,असे आव्हान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आज येथे केले आहे.





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील कर्मयोगी डॉ.शिवाजीराव विठ्ठलराव दळणर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच बरोबर मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते त्यांच्या प्रतिमेचे पूजन महाराज इंदुरीकर आणि सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांनी केले.





त्यानंतर इंदुरीकर यांचा सत्कार संस्थेचे सचिव कृष्णा भैया दळणर यांनी स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले," समाज प्रबोधनाचा काम संतांनी केले आहे. त्याच धर्तीवर समाज घडविण्याचे काम कर्मयोगी शिवाजीराव यांनी केले आहे. त्यांचा आदर्श इतर समाजातील तरुणांनी घेतला पाहिजे. आजची पिढी मोबाईलपीडी झाली आहे. त्यामुळे वाचन संस्कृती डबघाईस आली आहे. तरुणांनी मोबाईलचा वापर कमी करून काम, नोकरी, व्यवसाय केला पाहिजेत. 




त्याचबरोबर संतांची शिकवण तरुणांनी घ्यावी जेणेकरून वाईटमार्गेला जाणार नाहीत. संतांचा आदर्श तरुणांनी घेतला तर तरुण घडतो, असे सांगून महाराज म्हणाले," अनेक तरुणाचे लग्न होत नाहीत त्याचेच कारण नोकरी,व्यवसाय, अभ्यासापासून वंचित आहेत. जे शिकलेत नोकरीला लागलेत ते तरुण मात्र बेकार नाहीत. आई -वडिलांनी मुलावर संस्कार केले पाहिजेत तसेच मुलाकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, असेही आव्हान त्यांनी पालकांना केले आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(vnsnews24, feature)  




Post a Comment

0 Comments