Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/दहा वर्ष वयोगटातील फुटबॉल बेबी लीग स्पर्धेचे पुरस्कार प्रदान





परभणी  ➡️ या फुटबॉल लीग मध्ये संपूर्ण 28 मॅचेस खेळण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक मॉडेल उर्दू हायस्कूल या संघाने पटकविले. द्वितिय पारितोषिक ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल यांनी पटकाविली. तर तसेच तृतीय पारितोषिक हाजी मोहम्मद पडला प्रथमिक शाळा व ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल यांना पटकाविले. (vnsnews - 24, sports, parbhani) 




तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचे सय्यद अमान हुसेनी याला मिळवला. ज्याने एकूण ११ गोल केले तसेच या लीगमध्ये द्वितीय उत्कृष्ट खेळाडू म्हणून हाजी मोहम्मद पाडेला प्राथमिक शाळेचा खेळाडू सय्यद मोहम्मद जैन याला मिळवला. त्‍यांनी एकूण ०९ गोल केले होते. तसेच उत्कृष्ट गोल कीपर म्हणून ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलचा खेळाडू रितेश भराडी याला गौरव मिळाला. 



बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून परभणी क्रीडा अधिकारी संजय मुंडे , डॉक्टर शाकीर, स्पर्श हॉस्पिटल चेअरमन  इम्रान हुसेन, माजी नगरसेवक बालाजी मानोलीकर, नजम खान, रशीद खान, अलीम मामू, हनीफ, मोहमद जाहीर,आणि मुजाहेद खान उपस्थित होते. परभणी फुटबॉल बेबी लीग या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजन ग्लोब  स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव सय्यद शकील यांनी केले.







Post a Comment

0 Comments