Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  कांद्याचे पोते नेवून 'स्वाभिमानी'चे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आंदोलन





💠 सरकारी कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी     

परभणी ➡️ सरकारी कांदा खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांची फरफट थांबविण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.29) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात कांद्याचे पोते ठेवून आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (vnsnews-24, feature, parbhani ) 





त्यात नमूद करण्यात आले आहे कि, या वर्षी खुल्या बाजारात कांदा मातीमोल दारात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी व संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य शासनाने प्रतिक्विंटल ३५० रुपये कांदा विक्रीला अनुदान जाहीर केले आहे. साहजिकच ही अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा सरकारी खरेदी केंद्रावरच विकणे बंधनकारक आहे. 





आपल्या परभणी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्यापैकी भरपूर शेतकऱ्यांची कांदा काढणी झालेली आहे, मात्र जिल्ह्यातील सरकारी कांदा खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्री करून व शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. जर शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कांदा विक्री केला तर शासनाच्या अनुदानास पात्र राहणार नाही. म्हणून प्रशासनाने नाफेड मार्फत निदान जिल्हा पातळीवर १ ते २ कांदा खरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी केली आहे. 




यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, प्रसाद गरुड, उद्धव जवंजाळ, माऊली शिंदे, दुर्गादास खुळे,राजु खुळे, रामप्रसाद गमे, केशव आरमळ, मधुकर चोपडे, बाळासाहेब ढगे, मुंजाभाऊ लोडे यांच्यासह आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments