Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त शांतता रॅलीचे आयोजन






जिंतूर ➡️ भारतीय बौद्ध महासभा जिंतूर तालुका शाखा च्या वतीने सम्राट अशोक यांच्या 2327 व्या जयंतीनिमित्त 29 मार्च रोजी जिंतूर येथे भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. (vnsnews-24, feature, jintur ) 



जिंतूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार पासून सकाळी आठ वाजता सम्राट अशोक यांच्या प्रतिमा सहित भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या नंतर नगर परिषद कार्यालय परिसर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळी 10 वाजता धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर लातूर येथील प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड यांचा व्याख्यान चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 




या आयोजित कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपासक व उपासिका यांनी शुभ्र पोशाख परिधान करून उपस्थित रहावे अशी विनंती भारतीय बौद्ध महासभाचे जिंतूर तालुका अध्यक्ष शिवाजी लाटे सहित सर्व पदाधिकिरी यांनी केली आहे.






Post a Comment

0 Comments