Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयातील संशोधन कार्यशाळेस प्रतिसाद





परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयात स्ट्राईड अंतर्गत वाणिज्य विभागाच्या वतीने प्रकल्प लेखनाविषयी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. (vnsnews-24, education, parbhani) 



या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ.वसंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव,डॉ.एम.एन. सोंडगे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी,उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, विभागप्रमुख डॉ.मदन परतूरकर, डॉ.गणेश चालींदरवार  आदींची उपस्थिती होती.

 



उदघाटन सत्रात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.वसंत भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती विकसित व्हावी म्हणून संशोधन प्रकल्प लेखन पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर राबविले जातात. त्याच बरोबर त्यांनी तुलनात्मक संशोधन वृत्ती, निरीक्षण, टीकात्मक संशोधन तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प अहवाल तयार करताना संशोधन पद्धतीच्या चौकटीत राहून संशोधन कार्य केले पाहिजे असेही प्रतिपादन केले. 




अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रकल्पकार्य पूर्ण करीत असताना संशोधन पद्धतीच्या चौकटीत राहून आधुनिक आणि समाजोपयोगी संशोधन करणे काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकासामध्ये संशोधन दृष्टिकोन वृद्धिंगत होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत डॉ.एम.एन. सोंडगे तसेच डॉ.रोहिदास नितोंडे यांनीही विद्यार्थ्यांना संशोधन विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मदन परतूरकर, पाहुण्यांचा परिचय डॉ.प्रवीण धापसे, सूत्रसंचालन डॉ.एम.ए.रेहमान शेख तर आभार डॉ.गणेश चालींदरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.भारत जाधव,प्रा. नागेश देशमुख,प्रा.गोपाल परांडे, प्रा.अंकुश अबोली, प्रा.रेणुका पाठक, प्रा.सदाशिव पांचाळ,सुरेश पेदापल्ली,दत्तात्रय वाघमारे, साहेब येलेवाड आदींनी पुढाकार घेतला.






Post a Comment

0 Comments