Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ रास्ट्रसंत गोविंददेव गिरी यांच्या भागवत कथे ची जय्यत तयारी, भव्य मंडपाचे झाले भूमिपूजन





जिंतूर ➡️ आयोध्या श्रीराम जन्मभूमी श्रीराम मंदिर न्यास चे कोषाध्यक्ष तथा कृष्ण जन्मभूमी मथुरेचे उपाध्यक्ष प्रसिद्ध राष्ट्र संत स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन दिनांक ९ ते १५ डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे. या भागवत कथेच्या भव्य मंडपाचे भूमीपुजन आज स्वामी महेश महाराज जिंतूरकर यांच्याहस्ते व ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात करण्यात आले आहे. (vnsnews-24, feature, jintur) 





जिंतूर येथील बाजार समितीच्या मैदानात ही भव्य कथा संपन्न होणार असून यासाठी शहरातील सर्व समाजातून व्यवस्था यशस्वीपणे होण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत गोविंद देव गिरी महाराज यांच्या भागवत कथेसाठी राज्यभरातून शेकडो भक्त उपस्थिती राहणार असून जिंतूर तालुक्यातील व पंचक्रोशीतल भक्त मंडळी पण मोठयसंख्येने उपस्थित राहतील यासाठी आज पासून भव्य दिव्य मंडपाची उभारणी होत आहे याचे मंडपाचे भूमिपूजन  आज संपन्न झाले. 




या वेळी संदीप भाई शर्मा, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, गोविंद पोरवाल, प्रदिप कोकडवार, प्रदिप राठी, नारायण सोमाणी, पत्रकार मंडळी व कथेचे यजमान मुकुंद कोकडवार, संजय कोकडवार परिवारासह उपस्थित होते. (vnsnews-24, feature, jintur) 







Post a Comment

0 Comments