Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ 100 किमी सायकलिंगद्वारे जेष्ठ नागरिक रमेश धोत्रे व सत्यनारायण चांडक यांनी दिली शहिदांना श्रद्धांजली




परभणी ➡️ आज दि 26 नोव्हेंबर आजच्याच दिवशी 26/11 हल्यास 14 वर्ष पूर्ण झाले पण या हल्ल्यात शाहिद झालेले पोलीस व जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परभणीतील दोन ज्येष्ठ नागरिकांनी 100 किमी सायकल प्रवास केला. परभणी येथील सेवानिवृत्त बँक अधिकारी सत्यनारायण चांडक (वय 66) व नाशिक येथील सेवानिवृत्त अधिकारी रमेश धोत्रे (वय 65) यांनी परभणी - शेळगाव विष्णू - साळापुरी - परभणी असा सायकल प्रवास करून शाहिदाना श्रद्धांजली वाहली. (vnsnews-24, feature, parbhani ) 

 




आज सकाळी पहाटे 06:30 वाजता या दोघांनी परभणी हुन निघून उमरी, भारस्वाडा, ब्रम्हपुरी, शिरशी मार्गे शेळगाव विष्णू मंदिर येथे पोहोचलो. तिथे विष्णू मंदिर, मोहिणी मंदिर व भस्मासुर मंदिराचे दर्शन घेतले. शेळगाव ग्रामस्थांशी त्यांनी सायकलिंग व फिटनेस संदर्भात संवाद साधून  नियमितपणे व्यायामाचे महत्व सोबत इंधन बचतचा संदेश दिला. 





शेळगाव येथे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. परतीच्या प्रवासात त्यांनी साळापुरी येथे महादेव मंदिराचे दर्शन घेऊन साळापुरी ग्रामस्थांशी संवाद साधून दैठणा पोहोचलो. दैठणा येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आजच्या दिवशी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सायकल राईडविषयी संवाद साधला. पुढे पोखर्णी मार्गे परभणी पोहोचून 100 किमी सायकलिंग त्यांनी पूर्ण केली. 





तसेच वाटेत सायकल पंचर होऊन देखील कोणतेही बॅकअप वाहन न मागवता तसेच सायकल ढकलत पंचर जोडून पुढील प्रवासास मार्गक्रमण केले. त्याच्या या यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सायकल राईड बद्दल पेस सायकलिंग ग्रुप परभणी, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन ने शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. (vnsnews-24, feature, parbhani ) 








Post a Comment

0 Comments