Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या कार्यालयात "दक्षता जनजागृती सप्ताह"





सेलू ➡️ सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालय मध्य आज दिनांक 31आक्टोबर ते 06 नोव्हेंबर या कालावधीत "दक्षता जनजागृती सप्ताह" साजरा केला जाणार आहे  संतोष कोडगिरकर (शाखा प्रबंधक) यांचे हस्ते आज दिनांक 31आक्टोबर 2022 रोजी करण्यात आले दिनांक 31/10/2022 ते 06/11/2022 पर्यंत सप्ताहचे आयोजन करण्यात आले. (vnsnews-24, feature, selu ) 




सप्ताह निमित्त कार्यालया मध्ये आज दिनांक 31/10/2022  सोमवार रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मूलना बाबत "सत्यनिष्ठा शपथ"  आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगती मध्ये भ्रष्टाचार हा एक प्रमुख अडसर आहे, असे मला वाटते. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटित पणे काम करावे असे मला वाटते. 




प्रत्येक नागरिकाने सदैव सचोटी व एकात्मता या तत्वांच्या पूर्ततेसाठी सतर्क व कटिबद्ध रहाण्याची दक्षता घ्यायला हवी. तसेच भ्रष्टाचाराविरूद्ध लढा देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी प्रतिज्ञा करतो की, मी जीवनात नेहमी सच्चेपणा आणि कायदूयाने पालन करीन, कधी ही लाच देणार आणि घेणार नाही, सर्व कामे प्रामाणिक पणाने आणि पारदर्शक पद्धतीने करीन, लोक हिताच्या दृष्टीने काम करीन, वैयक्तिक वर्तणूकीतुन एकात्मतेचे उदाहरण दाखवून देईन, संबंधित संस्थेना भ्रष्टाचाराची घटना लक्षात आणून देईन, शपथ घेऊन सप्ताहास सुरूवात करतात आली.





या वेळी भुषण बक्षी, रामचंद्र साखरे, अविनाश जोशी, सुनील वाकडे, शमशोदीन शेख, अजय पुंडलिक, गोपाळ गाडगे, अनिल यादव, शिवाजी अघाव, सुभाष दाभडकर, जाकेर शेख, शिवाजी अघाव,अरूण चाटे, शूभम जोशी, अमोल जाधव, सुबोध पांडे, भालचंद्र बर्डे, अरूण साळवे, शंकर जिवने, गजानन वाकडीकर,शेख आमिर, नितीन भिसे, गोविंद कारके अदि उपस्थित होते.(vnsnews-24, feature, selu ) 









Post a Comment

0 Comments