Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ शिक्षणाधिकारी किरण लोहार 25 हजार रुपायांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात




सोलापूर ➡️ पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली. लोहार यांच्यासह लिपिकाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.31) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.(vnsnews-24, crime, solapur) 





या प्रकरणातील तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग वाढविण्यासाठी शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.





तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच सापळा लावला होता. सोमवारी (ता. 31) तक्रारदाराला कार्यालयात बोलावून त्याच्याकडून 25 हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पुढील कारवाई केली जात आहे. (vnsnews-24, crime, solapur) 





झेडपीच्या प्राथमिक शाळांची स्थिती सुधारण्याच्या बाता मारत शिक्षकांना उपदेशाचे धडे देण्यामुळे शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत होते. त्यांच्याविरूध्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे अनेक शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी स्वामी यांनी लोहार यांना नोटीस काढून काहीही न बोलण्याचा सल्ला दिला होता. (vnsnews-24, crime, solapur) 





रविवारी (ता. 30) लोहार यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते लाच घेताना रंगेहाथ पकडले, हे विशेष. लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.





किरण लोहार कोल्हापूरमध्येही अत्यंत वादग्रस्त कारकिर्द

किरण लोहार यांची 13 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम केलं आहे. तथापि, कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केला होता. 




त्यामुळे लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला. सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. नंतर लोहार यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती.





🚔 पीएच.डी आणि विद्यापीठाची सुद्धा चांगलीच चर्चा

किरण लोहार जिल्हा परिषदेतील कामाच्या पद्धतीवरून जितके वादग्रस्त ठरले. त्याच पद्धतीने त्यांची पीएच.डी सुद्धा चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी एका खासगी विद्यापीठाने पीएच.डी दिल्यानंतर त्यांनी एकप्रकारे सूचनावजा फर्मान काढताना गावभर फलक लावण्यासाठी सांगितले होते. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली होती.




पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाले होते. टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. (vnsnews-24, crime, solapur) 






Post a Comment

0 Comments