Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | parbhani | सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची प्राची गट्टाणी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत देशात प्रथम





परभणी
➡️  सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेली विद्यार्थीनी  कु. प्राची गट्टाणी हिने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘राष्ट्रीय परीक्षा एजन्सी’ (एन.टी.ए.) द्वारे आयोजित केंद्रिय विद्यापीठातून पदव्युत्तर (गृहविज्ञान) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेमध्ये 248 स्कोअर घेऊन देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. 




प्राची हिने पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापासूनच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेमध्ये स्वतःची रुची निर्माण केली होती. तिला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्रोत्साहन देत राहिले. 



तसेच महाविद्यालयांमध्ये डॉ. जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मंचचा तिला उपयोग झाला.



तिच्या यशासाठी डॉ. वीणा भालेराव आणि प्रा. प्रियंका स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. सुनील जावळे डॉ. गोदावरी पवार आणि डॉ. मिर्झा यांचेही मार्गदर्शन तिला लाभले. 



या तिच्या यशाबद्दल डॉ. जया बंगाळे, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. नाहीद खान, डॉ. सुनीता काळे, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. इरफान सिद्दिकी, डॉ. शंकर पुरी, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. कल्पना लहाडे, डॉ. अश्विनी बिडवे तसेच सर्व कर्मचा-यांनी तिचे अभिनंदन केले.






Post a Comment

0 Comments