Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | crime | wardh | तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या 11 पानटपरींवर कारवाई , 11 हजाराचा दंड वसूल




वर्धा ➡️ तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाने समद्रपूर तालुक्यातील 11 तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पानटपरीवर कारवाई केली असून त्यात 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 



सदर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ.नम्रता  सलुजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार व कर्मचारी तसेच समुद्रपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रविण काळे यांच्या नेतृत्वात जितेंद्र वैद्य, सचिन भडे यांनी कार्यवाही पार पाडली. 



तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याची वाढती संख्या लक्षात घेता. उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, हृदयविकास, कॅन्सर सारखे आजार हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे होत असतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो. जो शरीराला हानिकारक ठरतो. 



तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणे हे लहान मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 



तसेच 29 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सूपारी, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास व थुंकन्यास आणि धुम्रपान करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी कळविले आहे.






Post a Comment

0 Comments