Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर तालुक्यात ढोल ताशाचा गजरात मोठ्या उत्साह श्रीगणेशाचे स्वागत




जिंतूर शहरातील पोलिस ठाणे परिसरात श्रीगणेशाची मुर्ती ढोलताशाच्या गजरात नेताना.

जिंतूर
➡️ आज श्री गणेश चतुर्थीनिमित्त जिंतूर शहरात आणि ग्रामीण भागात गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... असा जयघोष करत गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात आज बुधवारी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. दोन वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नव्हता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा केला जात आहे. 



येलदरी कॅम्पस परिसरातील गणेश मुर्ती खरेदी करताना भक्ताचे दृश्य



श्री गणेश चतुर्थीनिमित्त जिंतूर शहरातील पोलीस स्टेशन रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून गणेश मूर्ती विक्रेत्यांची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा गणेश मूर्ती, पुजेचे साहित्य विक्रेते, सजावट साहित्य यासह विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. गणेशमूर्ती, पूजेच्या साहित्य खरेदीच्या निमित्ताने हा परिसर सकाळपासून गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.





सावंगी (म्हाळसा)



जिंतूर तालुक्यातील सावंगी (म्हाळसा), येलदरी कॅम्प येथे आज दिवसभर महिला, पुरुष व लहान मुले, गणेशभक्तांची गणेशमूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. आज शहरासह ग्रामीण भागात भक्तीमय वातावरणासोबतच उत्साहाचे वातावरण होते. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, ढोलताशाचा गजर करत गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करत होते. त्यामुळे परिसरात एकच जल्लोष दिसून येत होता.







Post a Comment

0 Comments