Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | jintue | जिंतूर तालुक्यातील कौसडीसह 19 गावात गणेश चतुर्थीच्या दिवशीही महावितरणकडून भारनियम




जिंतूर ➡️ तालुक्यातील कौसडी ( kosadhi)  येथून जवळ असलेल्या कान्हड येथील विद्युत उपकेंद्र (power substation) कोणत्या ना कोणत्याही कारणाने सदैव चर्चेत असते. या विद्युत उपकेंद्राच्या गलथान कारभारामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. सणा - सुधीच्या दिवशीही या विद्युत उपकेंद्राकडून भारनियम (load) घेण्यात येत आहे.




कान्हड येथील विद्युत उपकेंद्राच्या गलथान कारभाराकडे सहाय्यक अभियंता यांचे दुर्लक्ष होत असून  कर्मचाऱ्यांवर वचक राहिली नाही. मार्च एंडच्या नावाखाली विद्युत ग्राहकांकडून लाखो रुपयाची सहाय्यक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली करण्यात आली. परंतु विद्युत पुरवठा ( Power supply) देण्यासाठी महावितरण कंपनी असक्षम आहे.



तालुक्यातील कान्हड विद्युत उपकेंद्रावरून (power substation) गुळखंड, तांदळवाडी, कुपटा, भांगापूर, चिमणगाव, हट्टा, आडगाव दराडे, कान्हड, मारवाडी, कुंभारी, पिंपळगाव गायके, कौसडी, मंगरूळ तांडा, गोंधळा, नागठाणा यासह इतर गावांना विद्युत पुरवठा केला जातो.





अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला तर आठ - आठ तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येत नाही. या विद्युत उपकेंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांची  कमतरता असल्याने याचा नाहाक त्रास ग्रामस्थांना सोसावे लागत आहे. 




या विद्युत उपकेंद्राच्या गलथान कारभारामुळे प्रत्येक गावात विद्युत तारे लोंबकळत आहे तर अनेक डीपी (dp) उघडेच असून डीपीत फ्युज सुद्धा नाही या विद्युत उपकेंद्राकडून ग्रामस्थांच्या जीविकास खेळ खेळला जातो. आज गणपती बाप्पाचे विराजमान झाले असून कमीत कमी 8 दिवस तरी या विद्युत उपकेंद्राकडून भारनियम घेण्यात येऊ नये अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी होत आहे.







Post a Comment

0 Comments