Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴️ भाजपा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार- डॉ. सुभाष कदम





पालम  [  आरूणा शर्मा  ] ➡️ भारतीय जनता पार्टी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण डॉ. सुभाष कदम यांनी पालम येथे गजानन मंगल कार्यालय येथे आयोजित भाजप तालुका शाखेच्या  कार्यकारिणीच्या बैठकीत दि. 30 जुलै रोजी केली आहे.






पालम येथील शिक्षक कॉलनी परिसरात गजानन मंगल कार्यालय भाजपाच्या तालुका शाखेच्या वतीने कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली. या बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव रबदडे ( मामा), संतोष भाऊ मुरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी टोले, पालम तालुका अध्यक्ष शिवाजी दिवटे, गंगाखेड तालुका अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, पालम तालुका प्रभारी बालाजी रुद्रवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.




या बैठकीत भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रयत्नातून राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजपाच्या युतीचे सरकार सत्तेत आल्याबद्दल, सत्तेत आल्यानंतर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देणे, मेट्रो प्रकल्पाला गती देणे, शेतकऱ्यांच्या हिताचे नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देणे, असे एक नवे अनेक महत्त्वाचे निर्णय एका महिन्याच्या आत घेण्यात आले त्याबद्दल अभिनंदन याचा ठराव घेण्यात आला. तसेच आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंत व जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येईल, उमेदवाराच्या पाठीमागे संपूर्ण पक्षाची ताकद राहील अशी ग्वाही यावेळी मार्गदर्शन करताना यांनी दिली.




या बैठकीला विठ्ठल रबदडे( मामा),संतोष भाऊ मुरकुटे,बालाजी रुद्रवार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे यांनी केली तर सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस भगवान करंजे यांनी केले. या बैठकीला भाजपाचे साहेबराव सुरनर, नगरसेवक लक्ष्मण रोकडे,रुपेश शिनगारे, नंदकुमार बलोरे, अशोकराव पोळ, सूर्यकांत पळसकर,डॉ बडे,नागनाथ आप्पा खेडकर,अण्णासाहेब किरडे, माऊली पैके, रघुनाथ पोळ, विठ्ठल कदम, गोपीराज शिंदे, सोपान कराळे, तुकाराम कराळे, बालाजी बर्डे,  नागेश सोनटक्के, विनोद मोरताटे,राम गावंडे, तुकाराम टोकलवाड यांच्यासह यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments