Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 परभणीत वांगी रस्त्यावरील नागरीकांचा धडक मोर्चा





परभणी ➡️ येथील वांगी रस्त्यावरील बर्फ कारखाना ते हडको पर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी आणि रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेची देयके महापालिका प्रशासनाने हेतुतः अडविल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरीकांनी 29 जुलै रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला.




वांगी रस्त्यावरील या संतप्त नागरीकांनी बर्फ कारखाना ते हडको पर्यंतच्या रस्त्याच्या भयावह अवस्थेच्या निषेधार्थ महापालिका प्रशासनास वारंवार निवेदने सादर केली, आंदोलनेही केली. परंतु, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा परिणाम संतप्त नागरीकांनी शुक्रवारी वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. 




शेख बाबा मियाँ शेख कासीम पिंजारी, शेख खॉजा मियाँ, कैलास गायकवाड, नजमोद्दीन अन्सारी, भिमराव पवार, शेख युसूफ कलीम, सुरेश थोरात, मोहम्मद हुसैनी, सुर्यवंशी, प्रकाश वाकळे, धम्मपाल वाकळे, आम्रपाली खराबे, सदाशिव भूतकर, बाबा खंदारे यांच्यासह अन्य नागरीकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत धडक मोर्चा सुरु केला. या मोर्चाने संपूर्ण बाजारपेठ अक्षरशः दणाणली. जिल्हाधिकारी कार्यालयात एका शिष्टमंडळाने पुन्हा निवेदन सादर करीत या मागण्यांकडे लक्ष वेधले.






Post a Comment

0 Comments