Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत चिखलात ठिय्या मारुन क्रांती नगर व तिरुपती नगरातील नागरीकांचे आंदोलन





परभणी ➡️ महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील रस्ते व नाल्यांच्या भयावह अवस्थेच्या निषेधार्थ तिरुपती व क्रांती नगरातील संतप्त नागरीकांनी बुधवारी (दि.29) चक्क रस्त्यावरील चिखलात ठिय्या मारुन लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला.









या भागात कच्चे रस्तेसुध्दा अस्तित्वात नाहीत. नाल्याही नाही. रस्त्यांवरच पाणी वाहत आहे. जागोजागी खड्डे व चिखल झाला आहे. पावसाळ्यात येथून ये जा करतांना नागरीकांना अक्षरशः यातना सहन कराव्या लागत आहेत. असे असतांनासुध्दा या भागातील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसह महापालिका प्रशासनानेसुध्दा तात्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात पावले उचलली नाहीत. त्यामुळे संतप्त नागरीकांनी बुधवारी थेट चिखलातच ठाण मांडून महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला.







ऋषिकेश सावंत, सतीश लांडे, विश्‍वजित काटकर, राजेभाऊ ढगे, संतोष रेवणवार, विठ्ठल नरवाडे, ज्ञानोबा पवार, हनुमान जवंजाळ, ओंकार महाकाळ, नारायण दांडगी, विशाल अंभुरे, रोहन राठोड, अंकुर जमदाडे, अंकुश बालटकर, नरहरी पांचाळ, शिवाजी जावळे, धनंजय जाधव, सूर्यकांत उदावंत, गंगाधर दंडेवाड, तुकाराम शिंदे, साई स्वामी, लक्ष्मण चित्रे आदी सहभागी झाले होते. या संतप्त नागरीकांनी दहा दिवसांच्या आत रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास प्रखर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला आहे.








Post a Comment

0 Comments