Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳ कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांनी संकटांना ध्येर्याने सामोरे जावे -  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी




✡ पीएम केअर कार्यक्रम : प्रधानमंत्री यांनी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद 

परभणी ➡️ कोरोना संसर्गाच्या काळात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत मिळणे फार महत्त्वाचे आहे. या बालकांनी संकल्‍प करुन आपली उज्वल भविष्याची वाटचाल करावी जेणेकरुन त्यांचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. या बालकांना आपले संकल्प सिध्द करण्यासाठी त्यांचे सामर्थ्य फार महत्वाचे ठरणार आहे. कोरोनाच्या काळात संकटात सापडलेल्या बालकांनी सामर्थ्य दाखविले आहे. जीवनात संकटे माणसाची परिक्षा पाहण्यासाठी येत असतात. तरी कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांनी संकटांना ध्येर्याने सामोरे जावे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांनी यावेळी केले.





जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पीएम केअर फॉर चिल्ड्रेन कार्यक्रमाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बोलत होते. यावेळी परभणी येथे जिह्वाधिकारी आंचल गोयल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, परिविक्षाधीन अधिकारी अर्चना मानवतकर, जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेली मुले-मुली व त्यांचे नातेवाईक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 




प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की,  कोरोनाच्या संकटावर मात करीत आम्ही नव्या उमेदीने कार्य करत आहोत. गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कार्य करत असून तंत्रज्ञानाचा उपयोग करुन गरीबांचे अधिकार संरक्षित केले जात आहेत. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत देण्यासाठी गरीबांच्या मनात विश्वास निर्माण केला जात आहे. कोरोना काळात अनेकांच्या जीवनात व परिवारात खुप मोठी हानी झाली ती कधीही न भरुन येणारी आहे. काहींनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे हे दु:ख खुप मोठे आहे ते  शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. 





गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी राहतात परंतू मागे राहिलेल्या परिवारातील व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. पीएम केअरमध्ये सर्व देशवासीयांनी कोरोनाच्या काळात आपल्या मेहनतीच्या पैशाचे योगदान आहे. दोन्ही पालके गमावलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी, खाजगी शाळेत मुलांना प्रवेश असो की पुस्तके किंवा शाळेचा गणवेश असो यांचा खर्च उचलला आहे. या मुलांना पीएम केअर शैक्षणिक कर्जासाठीही मदत करणार आहे. 






तसेच जी मुले शिक्षण घेवून बाहेर पडतील त्या 18-23 वयोगटातील मुलांना विद्यावेतन मिळण्याची योजना केली आहे. तसेच मुलांना वयाच्या 23 व्या वर्षी एकरकमी 10 लाख रुपये मिळणार आहेत. त्यांना आयुष्यमान हेल्थ कार्ड देणार असून यात 5 लाख रुपयांपर्यतची वैद्यकिय सेवा मोफत दिली जाणार आहे. शैक्षणिकतेबरोबरच मानसिक मार्गदर्शनाची गरज लक्षात घेता संवाद हेल्पलाईनद्वारे या मुलांना वेळोवेळी सल्ला दिला जाणार आहे.





यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा सांभाळ करतांना त्यांचे नातेवाईकांना ओझे वाटणार नाही यासाठी पीएम केअरची मदत करण्यात आली असून मुलांचे पालकत्व स्विकारलेल्या  नातेवाईकांचे त्यांनी आभार मानले. जीवनात पुढे जाण्यासाठी शिक्षणाला फार महत्वाचे असून कोणीही आपले शिक्षण अर्ध्यावरती सोडू नका असे मार्गदर्शक सुचनाही त्यांनी उपस्थित बालकांना केली. तसेच शाळा व महाविद्यालय प्रवेशासाठी तसेच इतर काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.





कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत दोन्ही पालक गमावलेल्या एकुण 7 मुला-मुलींना पीएम केअर किटचे वाटप करण्यात आले. पीएम केअर किटमध्ये पीएम केअर प्रमाणपत्र, पोस्टाच्या बँकेचे पीएम केअर पासबुक ज्यामध्ये टप्प्याटप्प्याने 10 लाख रुपये जमा होणार आहेत. तसेच आयुष्यमान भारत कार्ड द्वारे 5 लाख रुपयांपर्यतचे वैद्यकिय उपचार या मुलांना मोफत घेता येणार आहे. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मुलाचे पालक उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments