Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳ पूर्णेत लहान भावाच्या निधनानंतर बहिणीने ही सोडला प्राण





परभणी ➡️ लहान भावाच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या बहिणीचेही र्‍हदयविकाराचा तीव्र झटका येवून निधन झाल्याने पूर्णेतील जैस्वाल कुटूंबियांवर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला. ही घटना दि. 30 मे रोजी पुर्णा शहरात घडली आहे.





पूर्णा शहरातील व्यवसायिक सुनील नारायणप्रसाद जैस्वाल यांचे रविवारी (दि.29 मे) सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते  62 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थीवावर दि.30 मे पूर्णेत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यावेळी त्यांची मोठी बहिण सुनीता विजय जैस्वाल (वय 62) या औरंगाबाद येथून पूर्णेत दाखल झाले.




लहान भावाचे अंतीम दर्शन घेतेवेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. भावाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांना र्‍हदयविकाराचा तीव्र झटका आला. प्रत्यक्षदर्शनींनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचे निधन झाले. भावा पाठोपाठ बहिणही गेल्याने जैस्वाल कुटूंबियांना अक्षरशः मोठा धक्का बसला. 



सुनील नारायणप्रसाद जैस्वाल यांच्यावर आज पूर्णेत  सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मोठी बहिण सुनीता विजय जैस्वाल यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले. याघटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील जैस्वाल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. सुनिता जैस्वाल या सेवानिवृत्त शिक्षीका आहेत त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.




         




Post a Comment

0 Comments