Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मनोज आव्हाड हत्या प्रकरणाच निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी





परभणी ➡️ औरंगाबाद येथे मनोज शेषेराव आव्हाड यास बेदम मारहाण करुन निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आज सोमवारी बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व लहुजी क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.



निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना होत असून त्याबाबत गांभिर्याने निर्णय घेऊन कठोर कारवाई करावी. अत्याचाराच्या असंवैधानिक घटना होऊ नये याकरीता कायदेशीरपणे कडक नियंत्रण करण्यात यावे. औरंगाबाद येथे सर्व आरोपींनी मनोज यास बेदम मारहाण करीत हातपाय बांधून लाकडी दांड्याने मारहाण करुन निघृण हत्या केली. 




या आरोपींवर सिडको पोलीस ठाणे औरंगाबाद येथे भा.द.वि. अन्वये कलम 302, 143, 147, 148, 149  भादंविनुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी मनोज यास घरुन घेऊन जाऊन हातपाय बांधून मारहान केली त्या बाबत अजुन कलम वाढ करण्यात यावी या मध्ये कलम 120 , ( ल ) भा.द.वि. अन्वये हि व हत्या प्रकरणी तात्काळ तपास करुन कलम वाढ करावी व होणार्‍या अन्याय अत्याचाराच्या घटना नियंत्रीत कराव्या, असे निवेदनात म्हटले आहे. 




तसेच हा खटला एसआयटीकडे देण्यात यावा. खटला तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चालवावा. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मनोज आव्हाडच्या परिवारास आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. मनोज आव्हाडच्या पत्नीस कायमस्वरुपी शासकीय सेवेत सहभागी करुन घ्यावे या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रदीप गांंधारे, लता एंगडे, बबन भंडारे, सुभाष साडेगावकर,सरिता भंडारे,विकास जाधव, कैलास साडेगावकर, गणेश मेहत्रेे, कैलास भालेराव, विनोद अंभोरे आदींच्या सह्या आहेत.






Post a Comment

0 Comments