Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलूत रोडगे प्रिमियर लीगचा मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न






सेलू  ➡️ सेलू तालुक्यात मराठवाडा स्तरावर प्रथम टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा डॉ. संजय रोडगे मित्र परिवार आयोजित रोडगे प्रिमियर लिग ऑल इंडिया टेनिस बाॅल नाईट लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सेलू-जिंतुर मतदार संघाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते नूतन महाविद्यालय मैदान येथे पार पडला. 




यावेळी बोलतांना माजी आमदार विजय भांबळे म्हणाले की, जसे अभ्यास करणे महत्त्वाचे आहे तसे शरिरासाठी क्रिडा महत्वाच्या आहेत. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी हा गुण स्पर्धकांमध्ये पाहीजे.उदयोन्मुख खेळाडूंना संधी निर्माण करून देण्याचे काम या नाईट मॅचेसच्या माध्यमातून डाॅ रोडगे यांनी केले आहे. 



अध्यक्षीय भाषणात डाॅ. रोडगे म्हणाले की, सेलू शहर हे आगोदर पासूनच सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत आहे. यामध्ये मराठवाड्यात प्रथमचं टेनिस बॉल  नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये प्रथम पारितोषिक 1,11,111/- , द्वितीय पारितोषिक 55,555/-, तृतीय पारितोषिक 33,333/-, चतूर्थ पारितोषिक 22,222/- तर मालिकावीर यांना मोटरसायकल व आकर्षक ट्रॉफी अशा भरगच्च बक्षीसांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी केले. 





यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा  वाशिम जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक डॉ. संजय रोडगे, प्रमुख उपस्थिती माजी आमदार हरिभाऊ लहाणे, परभणी जि.पचे. उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य राजेंद्र लहाणे, परभणी जि.प. सभापती तथा जि.प. सदस्य अशोकनाना काकडे,  समाज कल्याण विभाग सभापती रामराव उबाळे, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष छगनदादा शेरे, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती पुरूषोत्तम पावडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य, सुधाकर रोकडे, रा.कॉ.पार्टीचे तालुकाध्यक्ष माऊली ताठे, रा.कॉ.पार्टीचे महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे, मेडीकल असोशियशनचे अध्यक्ष, संदिप टाक, नारायण पाटील, मुख्य समालोचक मोहन बोराडे, अनिल शेळके, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्या प्रगती क्षीरसागर, डॉ. मिनाक्षी रत्नपारखी,  शालीनी शेळके, अपूर्वा पाॅलिटेक्नीकचे  प्राचार्य प्रा. अशोक बोडखे व एल.के.आर.आर  प्रिंन्स इग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री. कार्तिक रत्नाला आदी मान्यवर व क्रिकेट खेळाडू व असंख्य क्रिकेट प्रेमी खेळाडूंची उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम हत्ते व श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी प्रयत्न केले.







Post a Comment

0 Comments