Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्वतःवर विश्वास ठेवून यश मिळवता येते - प्राचार्या श्वेता काळे यांचे प्रतिपादन




विद्यापीठस्तरीय युवती कार्यशाळेचा समारोप

परभणी  ➡️ आपल्या जीवनातील परिस्थितीशी हतबल होऊन स्वप्नपूर्ती थांबवणे म्हणजे अपयश. त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करत निर्णयक्षमता विकसित करून स्वतःवर विश्वास ठेवून यशाला गवसणी घालता येते असे प्रतिपादन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ.श्वेता काळे यांनी केले. श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.30) रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकेसाठी आयोजित तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय युवती कार्यशाळेत समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.






यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते. यावेळी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्रचार्या डॉ.विजया नांदापूरकर, कार्यक्रमाधिकरी डॉ.तुकाराम फिसफिसे आदींची उपस्थिती होती.  युवतींना मार्गदर्शन करताना श्वेता काळे पुढे म्हणाल्या, आज मोबाईल क्रांतीमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे. त्याचा फायदा आपल्या करिअरसाठी करावा. आपल्याला काय करायचे आहे ते आपण पहिल्यांदा ठरवावे. 



मी ग्रामीण भागातील विद्यार्थींनी आहे, कसं करू? हा न्यूनगंड दूर करून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यश मिळवा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. युवतीमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, निडरता तसेच जीवनात सक्षम बनण्याच्या उद्देशाने रासेयोची ही कार्यशाळा युवतींसाठी आयोजित करण्यात आली होती. नक्कीच या कार्यशाळेच्या माध्यमातून युवतींना भविष्याचा वेध घेण्यासाठी दिशा मिळाली असेल.




प्रत्येक क्षेत्रात युवतींना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचे सोने करता आले पाहिजे असे मत अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते सहभागी युवतींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रसिद्धी प्रमुख डॉ.जयंत बोबडे, डॉ.दिगंबर रोडे, प्रा.सविता कोकाटे, प्रा.राजेसाहेब रेंगे, डॉ.प्रल्हाद भोपे, डॉ.राजू बडूरे, डॉ.वृषाली फुके, डॉ.संतोष कोकीळ, प्रा.देविदास गवळी, प्रा.अभिजित भंडारे,प्रा.स्वाती देशमुख, प्रा.वैशाली वसमतकर आदींची उपस्थिती होती.

 



याप्रसंगी प्रा.वैशाली वसमतकर, पौर्णिमा वाघमारे, ढवळे पृथ्वी, सानिका कदम आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अहवाल वाचन डॉ.तुकाराम फिसफिसे, सूत्रसंचालन मनूरकर शिवानी, तर आभार प्रदर्शन डॉ.दिगंबर रोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पेदापल्ली, अच्युत तरफडे, दासू मस्के, सय्यद सादिक, साहेब येलेवाड, गणेश गरड, महेश बरुडा, अमित बिडला, सागर खुणे,नितीन शिवभगत, विजय गुंगाने, गायकवाड ज्ञानेश्वर,नारायण पडोळे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी परभणी, हिंगोली, लातूर,नांदेड या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या.






Post a Comment

0 Comments