Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात पाथरी तालुक्यातील लिंबा येथे विदेशी मद्यसाठा जप्त





परभणी ➡️ पाथरी तालुक्यातील लिंबा साखर कारखाना याठिकाणी गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मॅगडॉल नं.1 व इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की विदेशी मद्यसाठा वाहतूक करत असताना पकडण्यात आला. सापळा रचून दि. 28 मार्च रोजी मध्यरात्री एक दुचाकी व एक चारचाकी वाहन संशयित वाहनांची तपासणी करून जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत.



गोवा राज्यातील निर्मित मॅगडॉल नं..1 व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 480 सीलबंद बाटल्या ( एकूण 10 बॉक्स ) ज्याची अंदाजे किंमत रुपये 76 हजार 800 रुपये आहे. गोवा राज्यातील निर्मित इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 192 सीलबंद बाटल्या. ( एकूण 4 बॉक्स ) ज्याची अंदाजे किंमत रुपये 28 हजार 800 रुपये आहे. 



महाराष्ट्र राज्याचे बनावट तयार केलेले मॅगडॉल नं.1 व्हिस्कीचे 180 मि.ली.क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण 216 लेबल ज्याची अंदाजे किंमत 1 हजार 80 रुपये इतकी आहे. महाराष्ट्र राज्याचे बनावट तयार केलेले इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण 200 लेबल , ज्याची अंदाजे किंंमत 1 हजार रुपये आहे. एक बजाज कंपनीची काळ्या रंगाची पल्सर दुचाकी आरोपीने टेहळणीसाठी वापरलेली अंदाजे 75 हजार रुपये किंमतीची आहे. 



एक पांढर्‍या रंगाची टाटा कंपनीची नेक्सॉन चारचाकी ही गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा वाहतुकीसाठी वापरात आणलेली अंदाजे किंंमत रुपये 10 लाख रुपये आहे. एक मोबाईल अंदाजे किंमत रुपये 5 हजार आहे. एका कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत 15 हजाराचा आहे. दुसरा एक मोबाईल असा एकूण 12 लाख 3 हजार 380  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 




या प्रकरणात आरोपी शामकुमार वैजनाथ नाईकवाडे (वय -38 वर्ष धंदा - मजुरी रा.तुकाराम नगर परळी जि.बीड), गणेश जगन्नाथ सुरवसे (वय -21 वर्ष धंदा- ड्रायव्हर रा.शिवनगर , परळी ता.परळी जि . बीड 3 ) गणेश माणिकराव नाईकवाडे (वय -23 वर्ष धंदा - मजुरी रा.बरकत नगर, परळी जि.बीड) यांना अटक करून यांंच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 ( अ ) ( ई ) 80 ( 1 ) 83,90, व 108 अन्वये गुन्हा नोंद केला. 




या कारवाईत निरीक्षक जी.एल. पुसे, दुय्यम निरीक्षक बी.एस मंडलवार,  एम.जी.मोरे, सी.एन. दहिफळे, जवान  व्ही.जी.टेकाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास  दुय्यम निरीक्षक बी.एस मंडलवार हे करीत आहेत.






Post a Comment

0 Comments