Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नाम फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत 





परभणी
➡️  नाम फाऊंडेशनच्या वतीने आज 30 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील सुमारे 75 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 25 हजारांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. 



याप्रसंगी परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तूबाकले तसेच ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष  किरण सोनटक्के, नाम फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक सौ. शीतल सोनटक्के  यांची प्रमुख उपस्थिती होती. 



आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये 154 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 25 हजार रूपयाची मदत नाम फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी सीईओ टाकसाळे यांनी उपस्थित लाभार्थ्यासाठी शासनातर्फे मोफत सिंचन विहिरी देण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असा निर्णय जाहीर केला. तेव्हा उपस्थित लाभार्थ्यानी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले.   



याप्रसंगी परभणी जिल्ह्याच्या सर्वच तालूक्यातून आलेल्या लाभार्थ्यानी नाम फाऊंडेशन प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. धनादेश वाटपाच्या या उपक्रमाद्वारे नाम फाऊंडेशनने एकूण 38.5 लक्ष रूपयांची मदत एकट्या परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी केली आहे.




Post a Comment

0 Comments