Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मरपल्ली, कुडली आणि सुभाषनगर सीमेवर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन




  कै. गुरुवर्य शांतलिंगप्पा स्वामी मरपल्लिकर.      

✴ नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार यांची उपस्थिती 

देगलूर ➡️ कुडली,सुभाषनगर सीमेवर हणेगाव - औराद रस्त्यावर मौजे जागृत त्रिशिव हनुमान मंदिर येथे कै. गुरुवर्य शांतलिंगप्पा स्वामी मरपल्लिकर यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ  ह. भ. प श्री सद्गुरू धोंडोपंत दादा साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



श्री ष. ब्र.108 शिवलिंग शिवाचार्य महाराज मठसंस्थान हेडगापुर व श्री ष. ब्र.108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान हणेगाव यांच्या पावन उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी,श्री सिद्धेश्वर व श्री नवग्रह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम सहित भजन, किर्तन,काकडा आरती, पारायण, हरिपाठ, हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम प्रारंभ होत आहे.



दिनांक 27 मार्च रविवार पासून ते 03 एप्रिल रविवार पर्यंत हरिनाम सप्ताह कार्यक्रम निमित्त निवृत्ती महाराज हल्लाळीकर,अवधूत महाराज एकंबेकर,बळवंतराव महाराज कुंटुरकर,रमेश महाराज मेहकर,बालाजी महाराज कत्तलवाडिकर,महादेव महाराज राउत बीड, नामदेव महाराज लबडे पंढरपूर,गाथा मूर्ती श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर असे नामवंतांचे कीर्तन व प्रवचन  होणार आहे अशी माहिती संयोजक  बालाजी महाराज कत्तलवाडीकर यांच्या वतीने सांगण्यात आले. 




याच बरोबर आळंदीहून 40 भजन- किर्तनकार यांचा समूह या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.व तसेच गायन सम्राट व मृदंग सम्राट यांचे सुद्धा याठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. 01 एप्रिल रोजी सुभाष नगर ग्रामस्थांन च्या वतीने अन्नदान होणार आहे तर 02 एप्रिल रोजी कुडली आणि 03 एप्रिल समाप्ती रोजी मरपल्ली ग्रामस्थां च्या वतीने अन्नदान होणार आहे. तरी सर्व सदभक्त मंडळी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संतसेवक चंद्रकांत शांतलींगप्पा मरपल्लीकर यांनी केले आहे.






Post a Comment

0 Comments