Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर पोलिस ठाण्यात माजी आमदार विजय भांबळे आणि रामप्रसाद बोर्डीकर सोबत 28 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल




 जिंतूर  ➡️ शहरातील औद्योगिक वसाहती परिसरात रविवारी (दि.27)  जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये मतदान सुरू होते. याच दरम्यान भाजपा व राष्ट्रवादीच्या दोन्ही माजी आमदारांनी आपआपल्या समर्थकांसह मतदान केंद्राबाहेर जमून करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन एकमेकांना भिडले. या प्रकरणात रविवारी रात्री उशीरा पोलीस निरीक्षक दिपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार विजय भांबळे आणि रामप्रसाद बोर्डीकर सोबत इतर 28 जणांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




या फिर्यादी मध्ये रविवारी  दि. 27.02.2022 रोजी सकाळी 8.00 बा जि.प.उर्दु शाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय समोर जिंतुर बंदोबस्त चेक केला असता नमुद अधिकारी व कर्मचारी हजर होते. तेवढ्यात पेट्रोलिंग करत असताना 9.20 बजे सुमारास आम्हास सोपनी कोकाटे यांना कळविले की बाहेर जि.प. प्रवेश गेटजवळ बोर्डीकर व भांबळे गटामध्ये निवडणूक कारणावरुन जमाव जमा झाला असुन निवडणूकीच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद चालु आहे. यावरुन पोलिस  कर्मचार्‍यांचा ताफा तत्काळ घटनास्थळावरुन पोहचला. तर त्या जागी शंभरएक लोकांचा जमाव दिसून आला. त्या लोकांना सपोनी कोकाटे व पोउपनी कोरके यांनी जमावला पी.एम. सिस्टम  वरून लोकांना निघुन जाण्याचे आवाहन करण्यात आले. माजी दोन्ही आमदारांना शांततेचे आवाहन केले. परंतु दोघां माजी आमदारांनी पोलिसांच्या या आवाहनाकडे  दुर्लक्ष केले. 





माजी रामप्रसाद बोर्डीकर हे विजय भांबळे यांनी म्हणत होते की, तु मतदार नसतांना इथे का आला? त्यावर विजय भांबळे हे त्यांना म्हटले की तु मतदान कर, लोकांना का जमवले आहे ?  त्यावरुन आम्ही दोघामध्ये वाद होऊ नये म्हणून त्यांना समजावत होतो. ते आमचे न ऐकता बोर्डीकर गटाचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, अ‍ॅड.गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, लक्ष्मण बुधवंत, दत्ता कटारे, नागेश अकात, मुन्ना गोरे, सुमेध सुर्यवंशी, एकनाथ देशमुख, लक्ष्मण इलग, बार्शीकर, अशोक बुधवंत, डॉ.पंडित दराडे, मुटकुळे तसेच राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे, बाळासाहेब भांबळे, बाळु काजळे, मनोज थिटे, हकीम लाला, कल्याण देशमुख, शोएब जानिमिया, रामचंद्र डोबे, दीपक शेंद्रे, शाहेद बेग मिर्झा, प्रल्हाद भांबळे, संजय निकाळजे, संजय भांबळे व दोन्ही पक्षाच्या जवळपास शंभर समर्थक कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे यातील 28 जणांविरुद्ध कलम 143,147,149,504 सह कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास फौजदार कोकाटे हे करत आहे.




 






Post a Comment

0 Comments