Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

निवासी, आश्रमशाळा सुध्दा सुरू होणार 1 डिसेंबरपासून – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार





मुंबई ➡️ बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरु असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलीसाठी चालविल्या जाणाऱ्या निवासी, अनिवासी आश्रमशाळांमधील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या आश्रमशाळा 1 डिसेंबर रोजी सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.


राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व शहरी भागातील महापालिका हद्दीतील इयत्ता चौथीचे वर्ग असलेल्या शाळा दि. 1 डिसेंबर, 2021 पासून सुरु करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.



त्यास अनुसरून या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आश्रमशाळा तसेच (वसतीगृहासह) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवासी व अनिवासी आश्रमशाळांनी, कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.




Post a Comment

0 Comments