Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

 'ओमिक्रॉन' नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणार्‍या प्रवाशांना आरटी-पीसीआर अनिवार्य; सरहद्दीवर 8 चेकपॉईटस




जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती 


परभणी  ➡️ दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणार्‍या ‘ओमिक्रॉन’ या नव्या कोरोना विषाणूचे संंभाव्य संकट लक्षात घेता महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सुचनांंची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परजिल्ह्यातून येणार्‍या प्रवाशांची आरटी-पीसीआर केली जाणार असून यासाठी मंगळवार (दि.30) पासून जिल्हा सरहद्दीवर 8 चेकर्पॉईट करण्यात येणार आहे.  तसेच परभणी शहरासाठी 6 चेक पॉईटसची व्यवस्था केली असून बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर तपासणीसह लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 




'ओमिक्रॉन' हा  नवा कोरोना  विषाणू कोणत्या देशात पसरत आहे :- 

या परिषदेत दक्षिण अफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचे शास्त्रीय नाव (बी. 1.1.529) असे आहे. ओमिक्रॉन या व्हॅरिएंट चा उगम दक्षिण अफ्रिकेत झाला आहे. या नव्या व्हॅरिएंट ने अवघ्या 04 दिवसात जगातील खालील 10 देशांमध्ये आपले हातपाय पसरविले आहे. या देशात 1) नेदरलॅंड 2)  इटली 3)  बेल्जियम 4) इसाईल 5) झेकरिपब्लीक 6) हॉगकॉग 7) ब्रिटन 8) बोस्ट्वाना 9) जर्मनी 10) दक्षिण अफ्रिका हे देश येतात. 



ओमिक्रॉन विषाणुची संक्रमण क्षमता अधिक :- 

आल्फा व डेल्टा या व्हॅरिएंट मध्ये फक्त 2 ते ३ ठिकाणी जणुकिय बदल झाल्याचे  आढळले होते. परंतु आल्फा पेक्षा डेल्टा बांधित रूग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ दिसुन आली. ओमिक्रॉन मध्ये तव्बल 30 ठिकाणी असे जणुकिय बदल दिसुन आले आहेत. त्यामुळे सदर विषाणुची संक्रमण क्षमता अधिक असल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे.



कोणत्या देशात नव्या रुग्णांची संख्या किती आहे :- 

1) फ्रान्स मध्ये दैनंदिन नविन रुग्णसंख्या पुन्हा 30 हजारच्या घरात गेली आहे. साप्ताहिक रुग्णसंख्येत सुमारे 80 टक्के वाढ झाली आहे. दैनंदिन मृत्यू सासाधारणपणे 80 च्या आत आहेत. या देशांत कोव्हिड लसीचा एक डोस घेतलेल्यांची संख्या 76.73 टक्‍के व दोन डोस घेतलेल्यांची संख्या 69.39 टक्के आहे. 

2) जर्मनी मध्ये दैनंदिन नविन रुग्णसंख्या पुन्हा 60 हजारच्या घरात गेली आहे. दैनंदिन मृत्यू साधारणपणे 300 पेक्षा पुढे आहेत. या देशांत कोव्हिड लसीचा एक डोस चेतलेल्यांची संख्या 70.34 टक्के व दोन डोस घेतलेल्यांची संख्या 67.69 टक्के आहे.

3)  ऑस्टीया या देशामध्ये कोरोना सुरु झाल्यापासुन आतापर्यंतची सर्वांत मोठी लाट आलेली आहे. दैनंदिन नविन रुग्णसंख्या पुन्हा 14 हजारच्या घरात गेली आहे. या देशांत कोव्हिड लसीचा एक डोस घेतलेल्यांची संख्या 69.49 टक्‍के व दोन डोस घेतलेल्यांची संख्या 65.10 टक्के आहे. 

4) नेदरलॅड या देशामध्ये कोव्हिड सुरु झाल्यापासुन आतापर्यंतची सर्वांत मोठी लाट आलेली आहे. दैनंदिन नविन रुग्णसंख्या पुन्हा 20 हजारपेक्षा अधिक आहे.या देशांत कोव्हिड लसीचा एक डोस घेतलेल्यांची संख्या 76.99  टक्के व दोन डोस घेतलेल्यांची संख्या 73.74 टक्के आहे.

5) अमेरिका मध्ये नोव्हेंबर 2020 सदृश्य परिस्थिती उद्‌भवली असून दैनंदिन रुग्णसंख्या 09 लाखापेक्षा अधिक आहे. दैनंदिन मृत्यू होणार्‍याची संख्या 02 हजारच्या आसपास आहे. या देशांत कोव्हिड लसीचा एक डोस घेतलेल्यांची संख्या 68.79 टक्‍के व दोन डोस घेतलेल्यांची संख्या 57.88 टक्‍के आहे. 

6) दक्षिण अफ्रिकेत गेल्या आठवडयामध्ये नविन रुग्णात किंचीत वाढ झालेली आहे. ओमिक्रॉन व्हॅरिएंटचे एकुण 59 रुग्ण सापडले आहेत. नविन व्हॅरिएंटमुळे लाट येण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे. या देशांत कोव्हिड लसीचा एक डोस चेतलेल्यांची संख्या 28.30 टक्के व दोन डोस घेतलेल्यांची संख्या 23.76. टक्के आहे.



या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, मनपा आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा व तातडीने कामाला लागा. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील. 



विदेशातून, परप्रांतातून तसेच परजिल्ह्यातून येणार्‍या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत दिले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. त्यानुसार प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. व्यापारी, नागरिकांनीही कोरोना नियमांचे पालन करावे, उल्लंघन केल्यास व्यक्तीस 500 रुपये दंड व संस्था किंवा आस्थापनांना 10 हजारापर्यंत दंड होवू शकतो, असेही श्रीमती गोयल यांनी स्पष्ट केले आहे.






Post a Comment

0 Comments