Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोणाचीही दिवाळी अंधारात होणार नाही; भा.ज.प .सेलूच्या आंदोलनाला यश 




सेलू [ श्रीपाद रोडगे ] ➡️ दिवाळीच्या काळामध्ये शहरी व ग्रामीण भागातील लाईट कट करू नये तसेच कट केलेली लाईट जोडावी तसेच सणावाराच्या काळामध्ये अचानकपणे लाईट जाणे हा प्रकार थांबवावा नसता दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर व आमदार सौ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी, सेलूच्या वतीने देण्यात आला होता. 




त्या अनुषंगाने अभियंता महावितरण सेलु च्या वतीने लेखी आश्‍वासन देण्यात आलेले आहे की दीपावलीच्या काळात कोणाचीही लाईट कट करण्यात येणार नाही तसेच जे वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण आहे ते पण थांबवण्यात येईल आपण आपले आंदोलन मागे घ्यावे अशे दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे.   



पाच दिवसांपूर्वी आयोजित आंदोलनासमध्ये जयसिंग शेळके, भागवत दळवे, नागेश ठाकूर, दगडोबा जोगदंड, संदीप बोकन, किशोर मुक्तावार, अमोल भोसले, बाळासाहेब काजळे, लालू खान, प्रकाश शेरे, लक्ष्मण बोराडे, नितीन चव्हाण, तुकाराम महाजन यांनी सहभाग घेतला होता.




Post a Comment

0 Comments