Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीच्या बाल वैज्ञानिकांनी केले पेलोड सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण





परभणी ➡️ एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तसेच क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सॅटेलाइट लॉन्चिंग हा अभिनव उपक्रम परभणी पासून जवळच असलेल्या भोसा इंद्रायणी माळावरून करण्यात आला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधून आलेले उत्साही पालक व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात यात समावेश होता. सॅटेलाइट लॉन्चिंग हा अभिनव उपक्रम परभणी वेगवेगळ्या शाळेतील इग्नायटेड माईड्स ग्रूपने इंद्रायणी माळ येथून दिनांक 31 10. 2021 रोजी यशस्वीपणे प्रक्षेपित केले.




या कार्यक्रमास परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक प्रमुख पाहुणे म्हणून परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.धीरज कुमार कदम, हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ.कैलास डाखोरे, आयसर परभणीचे अध्यक्ष डॉ.सुनील मोडक, डॉ.जगदीश नाईक डॉ. विठ्ठल सिसोदिया प्रा. डॉ गोपाल शिंदे, नवपुते- सुळसुळे फिजिक्स अकॅडमीचे कैलास सुळसुळे यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सॅटेलाइट कार्यक्रमाचं प्रास्ताविक आईसरचे सचिव प्रसन्न भावसार यांनी केले. 


सॅटेलाईट मोहिमेची संपूर्ण माहिती टीम लीडर उर्जित भावसार यानी दिली. या टीममधील उर्वरित सदस्य पार्थ ज्ञानोबा दराडे, हर्षद दीपक शिंदे, नीव महेश कांकरिया, सारा रोहिदास नितोंडे, इंद्रायणी किरण सोनटक्के, वेदिका अमिताभ कडतन, राशी तापडिया या बाल वैज्ञानिकांनी हा पेलोड उपग्रह तयार केला केला होता. कार्यक्रमाचं यशस्वी सुत्रसंचलन महेश शेवाळकर यांनी केले तर आभार कैलास सुरवसे यांनी मानले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, आयसरचे सचीव प्रसन्न भावसार, दीपक शिंदे, परभणी अस्ट्रोनिमिकल सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर, गजानन पांचाळ, माणिक गोरे, जिजा जाधव, पी आर पाटील, डॉ. विजय नरवाडे, वेदप्रकाश आर्या,  डॉ. रणजीत लाड, प्रसाद वाघमारे, अशोक लाड, अशोक शिरगदवार, अनिल पटवे, कृष्णा जावळे संगीतकार महेश काटे आदींनी अथक परिश्रम घेतले.








Post a Comment

0 Comments