Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पुलावरून पाणी जात असलेल्या मार्गाने प्रवास करणे टाळावे




परभणी ➡️ जिल्ह्यातील धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव इत्यादी मधून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील बऱ्याचशा रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांनी या पुलावरून प्रवास करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे. 


जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील माटेगाव, चुडावा, धानोरा काळे,आहेरवाडी आणि पूर्णा तर पाथरी तालुक्यातील रेनापुर, बोरगव्हाण, खेरडा, हादगाव, तुरा, वाघाळा आणि सोनपेठ तालुक्यातील गोरदळे नाला, शिरोरी, विटा खु, कान्हेगाव, डोबाडी तांडा आदी जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलाची ठिकाणे आहेत. तरी या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांनी टाळावे. असेही कळविण्यात आले आहे. 




Post a Comment

0 Comments