Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरात शनिवार-रविवारी महिलांसाठी लसीकरण







परभणी ➡️ परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवार आणि रविवारी महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे.



परभणी शहरात लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. जनजागृती सह विशेष शिबीर देखील घेतले जात आहेत. आता  शनिवार रविवार केवळ महिलांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे. 



हे लसीकरण महापालिकेच्या आरोग्य केंद्रात होणार आहे. या शिबीरात महिलांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौर सौ.अनिता सोनकांबळे,उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती गुलमीर खान,विरोधी पक्षनेते विजय जामकर,सभागृह नेते माजु लाला, गटनेत्या मंगलताई मुदगलकर,चंदु शिंदे यांनी केले आहे.


💠  ही लसीकरण केंद्र अशी 💉💉


1) जायकवाडी रुग्णालय, 2) इनायत रुग्णालय, 3) खानापूर रुग्णालय, 4) खंडोबा रुग्णालय, 5) साखला रुग्णालय, 6) शंकर नगर रुग्णालय, 7) वर्मा रुग्णालय. 




Post a Comment

0 Comments