Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी महापालीकेने सुरु केली दिव्यांग,व्याधीग्रस्तांसाठी घरीच लस देण्याची मोहीम 




परभणी ➡️ जे नागरिक शारीरिक व्याधींमुळे किंवा दिव्यांगतवामुळे किंवा वयोवृद्धपणामुळे लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत अशा नागरिकांना महानगर पालिके मार्फत घरोघर जाऊन लस देण्याची मोहीम सुरु करण्यात आल्याची माहीती आयुक्त देविदास पवार यांनी शनिवारी (दि.28) दिली आहे.


COVISHIELD: 18+ च्या लाभार्थी साठी पहिला डोस आणि दुसरा डोस उपलब्ध आहे. 

1) जायकवाडी रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC)  2) इनायत रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 3) खानापूर रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 4) खंडोबा रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 5) साखला रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 6) शंकर नगर रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 7) वर्मा रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 8) दर्गा रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 9) बालविद्या मंदिर: - COVISHIELD (GOVT CAMP) 

नोट :- रविवार दिनांक 29/08/2021 रोजी कोव्हीड-19 लसीकरण सकाळी 09 सकाळी ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत चालू राहील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. contact number: - +919049351999




शहरात महानगरपालीकेच्यावतीने कोराना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. ज्या नागरीकांना लसीकरण केंद्रावर येणे शक्य नाही अशा दिव्यांग, व्याधीग्रस्त नागरीकांना देखील लस मिळाली पाहीजे यासाठी परभणी शहर महानगर पालीकेने पुढाकार घेत थेट घरोघरी जाऊन लस देण्यास  सुरुवात केली आहे.


ज्या घरात वयोवृध्द,दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांच्या कुटूंबाने आपल्या जवळच्या  महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त पवार यांनी केले आहे. या पथकामध्ये कोऑर्डीनेटर ऑफिसर सॅम्युअल एम.एस, लसीकरण नोडल अधिकारी सय्यद इरफान, लसीकरण सहाय्यक शेख रिझवान व शेख जवाद, व्हॅक्सिनेटर जे.आर ठाकूर, व नियंत्रक निलेश जोगदंड यांचा समावेश आहे. 


 🔴 नोंदणी व टोकणची गरज नाही 🔴

 केंद्रावर ऑनलाईन नोंदणीशिवाय तसेच टोकनशिवाय  लस दिली जाणार आहे.लसीकरण केंद्रावर या आणि लस घ्या अशी मोहीम सुरु करण्यात आल्याचे श्री.पवार यांनी सांगीतले.




Post a Comment

0 Comments