Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी कोसळले दरड





औरंगाबाद
 ➡️ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. कुणीही औट्रम घाटामधून प्रवास करू नये असं आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे. 



कन्नड घाट बंद पडल्यामुळे औरंगाबाद मार्गे जाणाऱ्यांनी जळगावकडून, तर औरंगाबादकडे येणाऱ्यांनी नांदगावमार्गे येण्याचं आवाहन, महामार्ग सुरक्षा पथकानं केलं आहे. कन्नड तालुक्यात पिशोर इथल्या खडकी नदीला पूर आल्याने या रस्त्याने मोठ्या संख्येने दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. 


नागद परिसरातून मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना आणि नाल्यांना मोठा पूर आला आहे. 




Post a Comment

0 Comments