Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

घरपोच गॅस सिलेंडरच्या नावाखाली लूट थांबवा अन्यथा टाळे ठोको - प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा 





परभणी ➡️ जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये घरगुती व व्यवसायीक एल.पी.जी. गॅस वितरण करीत असतांना घरपोच सिलिंडर देण्याच्या नावाखाली गॅस एजन्सी ग्राहकांची लूट करीत आहेत. ही लूट थांबवावी अन्यथा टाळे ठोको आंदोलन करण्याचा आज इशारा प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आला आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोलियम व गॅस मंत्रालय भारत सरकार व एल.पी.जी. गॅस कंपनी यांनी निर्धारित करुन दिलेल्या मुल्यांमध्ये गॅस एजन्सी मालकाचे संपूर्ण खर्च व घरपोच सेवेचा खर्च समाविष्ट असतानाही गॅस वितरक मात्र घरपोच डिलेव्हरीच्या नावाने ग्राहकांकडुन ग्रामीण भागामध्ये 100 ते 150 रु. व शहरी भागामध्ये 50 ते 80 रु. अतिरिक्त उकळत आहेत. या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाकडे नागरीकांनी लेखी तक्रारी केलेल्या आहेत.


निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्ह्यातील प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख, शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मीडिया प्रभारी नकुल होगे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वकोडे, वैभव संघई इत्यादींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 




Post a Comment

0 Comments