Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कृषिमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे, भाजपा किसान मोर्चा परभणी ग्रामीणचे आंदोलन






परभणी ➡️ शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी भाजपा किसान मोर्चाच्या परभणी ग्रामीणच्या वतीने आज रविवार दिनांक 30 मे रोजी कृषी मंत्री दादाराव भुसे यांच्यासमोर निदर्शने करून काळे झेंडे दाखवण्यात आले. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला.

कृषी मंत्री भुसे हे रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनिमित्य दाखल झाले, त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाँ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कृषिमंत्री भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकमधेच थांबून बाहेर आले. भुसे यांनी भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकले,निवेदन स्वीकारले. 


यात परभणी जिल्ह्यातील 62 हजार शेतकर्‍याचे सोयाबीन व तुरीच्या पीकविम्याचे 69 कोटी 32 लाख 856 रुपये तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर पेरणीपूर्वीच वर्ग करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांनी पुणे येथील कृषी आयुक्तांना केली होती. शासनाने जाहिर केलेल्या निकषाप्रमाणे शासकीय पंचनामे गृहीत धरुन जिल्हयातील 1 लाख 4 हजार 689 शेतकर्‍यांच्या 85 हजार 49 हेक्टर बाधीत क्षेत्राचे पेरणीपूर्व तात्काळ पिकविमा परतावा अदा करा, असेही निवेदनात नमूद केले. खरीप 2020 ला शेतकर्‍यांनी स्वतःच्या खिशातून पिकविम्याचा हप्ता भरुन सोयाबीन, तुर, कापुस, मुग, उडीद इत्यादी पिके स्वरक्षित केली. पिके काढणीच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कापुस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्याच्या 24 हजार शेतकर्‍यांनी वैयक्तिक ऑनलाईन तक्रारी केल्या. त्या सर्व शेतकर्‍यांना सुध्दा पिकविमा कंपनीने अद्यापही परतावा दिलेला नाही, असेही जिल्हाध्यक्ष कदम यांनी नमूद केले. त्यांना लवकरात लवकर परतावा मिळण्याची व्यवस्था करावी,अशी आपण निवेदनातून मागणी केली.

भारतीय जनता पक्षाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधींनी आक्रोश केल्यानंतर शासनाने 5 मार्च 2021 रोजी पिकविमा देण्याचा आदेश दिला परंतु, अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाने केलेले पंचनामे ग्राहय धरुन जिल्हयातील सर्व सोयाबीन, तुर, कापुस, मुग, उडीद व अन्य पिकांचे विमाधारक शेतकर्‍यांच्या खात्यावर त्यांच्या हक्काचे पैसे बँक खात्यावर हस्तांतरण करावे, पिककापणी प्रयोगाच्या आधारावर दिला जाणारा पिकविम्यासाठी गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी, राणीसावरगाव व सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ आणि शेळगाव मंडळातील शेतकर्‍यांचे 39 कोटी 58 हजार 420 रुपये पिकविमा मिळण्यासाठी पात्र असतानांसुध्दा शासनाच्या दुर्लक्षामुळे या 4 मंडळातील शेतकरी त्यांच्या हक्काच्या सोयाबीन पिकविमा परताव्यापासून वंचीत आहेत. शेतकर्‍यांना त्यांचा हक्काचा पिकविमा पेरणीपूर्व जमा करावा, पिककापणी प्रयोगाच्या आधारावर गंगाखेड व पालम तालुक्यातील 30 हजार शेतकर्‍यांचा 30 कोटी 29 लाख 78 हजार 136 रुपये पिकविमा परतावा ता.25 मे पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणे बंधनकारक होते, परंतू या शासनाने शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे जाणूनबुजून दुर्लक्ष करुन कंपनीच्या हिताचे लाड करीत शेतकर्‍यांना अद्यापही अदा करण्याचे आदेश दिलेले नाहीत, अशी खंत कदम व्यक्त केली. वरील मागणी मान्य नाही केल्यास  7 जूनपासून जिल्हाभर भारतीय जनता पक्ष शेतकर्‍याच्या हक्कासाठी कोविड -19 नियम पाळून आंदोलन करणार करेल, असेही निवेदनात नमूद केले होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम आ.मेघना बोर्डीकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक, किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळुंके, बाळासाहेब जाधव,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, विजय कातकडे, तुषार कांबळे, बालटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवामोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




Post a Comment

0 Comments