Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरात 10 दुकानांकडून 1 लाख 35 हजारांचा दंड केला वसुल






परभणी ➡️ परभणी शहरात सोमवारी (दि..31)   लॉकडाऊनचे  उल्लंघन करणाऱ्या तब्बल 10 दुकानांकड़ून 1 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यात 9 कापड दुकाने आहेत.

शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही अनेक खाजगी अस्थापना,दुकाने सुरु राहत असल्याने परभणी शहर महापालीकने पोलीसांच्या मदतीने कारवाई सुरु केली आहे.ज्या दुकानांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे अशांना दंड लावण्यात येत आहे.सोमवारी (दि.31)   आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार मोहीम राबवण्यात आली.

अत्तिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार , नानलपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे  व सपोनि  तिप्पलवाड  यांच्या सोबत संयुक्त कारवाई करत आज कच्छी बाजार, जनता मार्केट, शिवाजी चौक,स्टेशन रोड या परिसरात आस्थापणा चालु ठेवल्याबद्दल इमेज मेन्स वेअर दंड रु 25000,लालपोतु कलेक्शन दंड रु 25000,वैशाली साडी सेंटर दंड रु 25000,लाइफ मेन्स वेअर दंड रु 10000,क्लासिक मेन्स वेअर दंड रु 10000,आरेफ मेन्स वेअर दंड रु 10000,जीवनी मेन्स वेअर दंड रु 10000,बुशरा बैंगल्स दंड रु 10000,पत्तेवार दुकान दंड रु 5000,अब्दुल कापड दुकान रु 5000 या  10 दुकांनावर कार्यवाही करत 1 लाख 35 हजार रुपयांचा  दंड वसुल करण्यात आला. या  कार्यवाही मध्ये सहभागी सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, मुकादम प्रकाश काकडे मोहन वाघमारे इत्यादींचा सहभाग होता.




Post a Comment

0 Comments