Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्ह्यात निवडणूक बूथ निहाय लसीकरण केंद्र उभारून लसीकरण मोहीम राबवावी






प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

परभणी ➡️ जिल्हयामध्ये सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोवीड प्रतिबंधीत लस देणे चालू आहे. परंतु या लस देण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ व प्रशासकीय पातळीवर समन्वय नसल्यामुळे नागरीकांना लस घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्याच बरोबर ग्रामीण भागामध्ये तर लस देण्या संदर्भात प्रशासनाने कुठलेही नियोजन केलेले दिसत नाही, त्यामुळे लस घेणाऱ्या नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असुन आपल्याला लस मिळते की नाही ही भिती निर्माण झाली आहे.

वय वर्ष 45 च्या वरील नागरीकांना लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची त्रेधात्रिपट उडत असताना केंद्राने 18 वर्षावरील नागरीकांना 01 मे 2021 पासुन लस देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. राज्यशासनाने जरी 01 मे 2021 ही तारीख पुढे ढकलली असली तरी या संपूर्ण लसीकरण मोहिमेचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडणार आहे व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळन्याची शक्यता आहे करिता यावर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.

जिल्हयामध्ये 18 वर्षावरील नागरीकांना तसेच सध्या देण्यात येणाऱ्या 45 वर्षावरील नागरीकांसाथीच्या लसीकरणा बाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृती आराखडा तयार करुन जिल्हयातील शहरी तथा ग्रामीण भागामध्ये सुनियोजीत पध्दतीने लसीकरण करावे जेणे करुन लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व सर्वाना लस उपलब्ध होईल या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी श्री. दिपकजी मूगळीकर, जिल्हाधिकारी परभणी यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनास काही विनंतीवजा सूचना सह निवेदन सादर केले.

निवेदनात जिल्हा प्रशासनास लसीकरण मोहिम राबविण्या बाबत काही सूचना देण्यात आले 

1) जिल्हयामध्ये 18 वर्षावरील नागरीकांचा आकडा विचारात घेता लसीची योग्य ती मागणी व साठा उपलब्ध करून ठेवावा.
2 ) विधानसभा निवडणूकीसाठी ज्या मतदान केंद्रांचा वापर केला जातो त्याच मतदान केंद्रांवर एक हजार ते एक हजार दोनशे नागरीकांना लसीकरण करण्यात यावे.
3) लसीकरण करीत असतांना सर्वांनाच ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही त्यामुळे लसीकरण केंद्रावरच वेगळी अशी नोंदणी व्यवस्था करण्यात यावी.
4) ज्या नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अशा नागरीकांना दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी.
5) ही लसीकरण मोहित यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई व आशा वर्कर यांची मदत घेण्यात यावी.
या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम व दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Post a Comment

0 Comments