Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लसीकरणात वर्धा जिल्हा राज्यात आठव्या तर विदर्भात तिसऱ्या स्थानी





वर्धा
➡️ महाराष्ट्रात 1 कोटी 53 लक्ष 37 हजार 832 नागरिकांचे लसीकरण झाले आहे जे देशात सर्वाधिक आहे. राज्यात जास्त लसीकरण करण्यात पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भाचा क्रमांक लागत असून राज्यात 45 पेक्षा अधिक वयाच्या लाभार्थ्याचे लसीकरणात लहान जिल्ह्यामध्ये वर्धा आणि भंडारा या दोन जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. यात वर्धा जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर असून  जिल्ह्यात 45 पेक्षा जास्त  वयोगटातील  36.76 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.  

राज्यात पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर असून  सांगली ,सातारा, पुणे, नागपूर, भंडारा, मुंबई आणि वर्धा  अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या , सहाव्या, सातव्या व आठव्या स्थानी आहे. जिल्ह्यात 45 वर्षे वयापेक्षा जास्त वयोगटात 4 लक्ष 7 हजार 707 नागरिक आहेत त्यापैकी 1 लक्ष 69 हजार 466 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वर्धा जिल्ह्यात लसीकरणाला गती देण्यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर केला होता. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला चांगली गती मिळाली. यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी परिश्रम केलेत. 



गावनिहाय नियोजन करून गावातील जेष्ठ नागरिक व 45 वर्षावरील अति जोखमीच्या व्याधीग्रस्त रुग्णांचे लसीकरण होईल यासाठी प्रयत्न केले.  गावातील जेष्ठ नागरिकांना प्रोत्साहित करून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या लसीकरण केंद्रापर्यंत नेण्याचे काम सरपंच आणि ग्रामसेवकांनी पार पाडले. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला गती मिळून काही गावांनी एकाच दिवशी जेष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले.  

यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी मोठी भूमिका बजावली. सुरुवातीला जिल्ह्यात 8 लसीकरण केंद्र सुरू होते. ही सांख्य हळूहळू वाढवत 8  केंद्रावरून 99 लसीकरण केंद्रापर्यंत पोहचली आहे. यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाणे सोपे झाले, तसेच यामुळे गर्दीही टाळता आली.  जिल्ह्यात आज 2 लक्ष 9 हजार 914 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 1 लक्ष 77 हजार 33 नागरिकांना पहिला डोज, तर 32 हजार 881 दुसरा डोज घेतला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 9 हजार लस उपलब्ध असून शासनाकडून लसीचा पुरवठा नियमित होत आहे. 

जिल्ह्यात लसीकरण झालेले लाभार्थी

हेल्थ वर्कर  -   27375
फ्रंट लाईन वर्कर -  13073 
60 वर्षावरील  - 96 635
45 वर्षावरील  - 72 831





Post a Comment

0 Comments