Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बांधकाम मजुरांना सरकारने आर्थिक भत्ता, निशुल्क राशन देण्याची मागणी





परभणी ➡️ कोरोना व्हायरस उदभवलेल्या परिस्थितीमूळे नोंदणीकृत बांधकाम मजुरांना सरकारने आर्थिक भत्ता, निशुल्क राशन व मुलांचे शिक्षणासाठी 4G फोन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांकांचे जिला कार्याध्यक्ष शोएब सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर तालुक्यातील मजुरांनी जिंतूर तहसिलदार कार्यालयमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 मार्चला निवेदन दिले. 

या निवेदनात सांगितले गेले कि सध्या जगभरात कोरोना वायरसने थैमान घातलेले असून कोरोना वायरस च्या भितीने जिल्ह्यातील सर्व कामकाज ठप्प आहे. सर्व कामकाज बंद असल्याने बांधकामे बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट भरणारे बांधकाम मजूर हे देखील उपासमारीचे शिकार झालेले आहेत. एकिकडे कोरोना सारख्या व्हायरस ची भीती तर दुसरी कडे कुटूंबाची होणारी उपासमार या विवंचनेत एकीकडे आड एकिकडे विहीर अशीच काहीशी परिस्थिती बांधकाम मजूरांची झालेली आहे.

सदर बांधकाम मजूर हे रोज काम करून आपला उदरनिर्वाह चालवित असल्याने त्यांची रोजची कमाई बंद असल्याने रोजनदारी कारणाने मजूर व त्यांच्या घरातील लहाण थोरांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. तरी महाराष्ट्र सरकारने तात्काळ सर्व नोंदनीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक भत्ता म्हणून त्यांच्या खात्यावर महाराष्ट्रा सरकारने 03 महिन्याचे 10 हजार रुपये प्रती महिना भत्ता व प्रती यूनिट 05 किलो राशन व कामगारचे मुला शिक्षणसाठी 4G फोन,  मास्क,सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर  सय्यद वसीम (बापु), शेख अनवर लाला, राष्ट्रवादी अल्पसंख्यक जिल्हा कार्याध्यक्ष परभणीचे शोएब सिद्दीकी शफी राज, पठाण शोएब, सय्यद ज़मीर, शेख ज़ाहिर, मुख्तार शेख, सय्यद माबूद इत्यादीचे स्वाक्षरी आहे.




Post a Comment

0 Comments