Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 79 व्यक्ती कोरोना बाधिताची भर, 24 जणांचा मृत्यू





नांदेड ➡️ जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 918 अहवालापैकी 1 हजार 79 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 460 तर अँटिजेन तपासणीद्वारे 619 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 43 हजार 35 एवढी झाली आहे. एकूण रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या ही 31 हजार 847 आहे. आज 10 हजार 157 रुग्ण उपचार घेत आहेत. 172 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

बुधवार 31 मार्च 2021 रोजी  24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 794 एवढी झाली आहे. आज 854 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 15, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 562, मुखेड कोविड रुग्णालय 27, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 20, धर्माबाद 20, उमरी 21, हदगाव कोविड रुग्णालय 34, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6 , भोकर तालुक्यातंर्गत 10, कंधार तालुक्यातंर्गत 27, माहूर तालुक्यातंर्गत 7, अर्धापूर तालुक्यातंर्गत 18, खाजगी रुग्णालय 87 असे एकूण 854 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 295, नांदेड ग्रामीण 13, भोकर 10, देगलूर 6, हिमायतनगर 41, लोहा 35 , किनवट 13, नायगाव 16, कंधार 14, बिलोली 5, हदगाव 1, मुखेड 8, हिंगोली 1, लातूर 1, अकोला 1 असे एकूण 460 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 304, नांदेड ग्रामीण 40, अर्धापूर तालुक्यात 27, भोकर 11, बिलोली 26, देगलूर 28, धर्माबाद 20, हदगाव 1, हिमायतनगर 9, कंधार 3, किनवट 43, लोहा 26, माहूर 3, मुदखेड 10, मुखेड 33, नायगाव 20, उमरी 11, उस्मानाबाद 1, हिंगोली 1, आंध्रप्रदेश 1, पुणे 1 असे एकूण 619 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 157 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 240, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 98, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 125, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 122, मुखेड कोविड रुग्णालय 243, देगलूर कोविड रुग्णालय 43, हदगाव कोविड रुग्णालय 50, हदगाव कोविड केअर सेंटर 40, लोहा कोविड रुग्णालय 105, कंधार कोविड केअर सेंटर 10, महसूल कोविड केअर सेंटर 205, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 996, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 805, खाजगी रुग्णालय 642, बिलोली कोविड केअर सेंटर 32,  जैनब हॉस्पीटल कोविड केअर देगूलर 64, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 24, माहूर कोविड केअर सेंटर 21, भोकर कोविड केअर सेंटर 17, हिमायत नगर कोविड केअर सेंटर 4, धर्माबाद कोविड केअर सेंटर 56, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, बारड कोविड केअर सेंटर 4, मांडवी कोविड केअर सेंटर 21, लातूर येथे संदर्भित 1 असे एकूण 10 हजार 157 कोविड बाधित उपचार घेत आहेत. बुधवार 31 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे.

 





Post a Comment

0 Comments