Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 07 मार्चपर्यंत धार्मीकस्थळे बंद, मोर्चे, निदर्शनांवर, विदर्भातील वाहतुकीस प्रतिबंध





परभणी ➡️ कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष, संघटनांच्या मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, उपोषणे व अन्य सर्व प्रकारच्या आंदोलनांवर व सर्व धार्मीकस्थळे आणि विदर्भातील वाहतुकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 07 मार्चपर्यंत निर्बंध जारी केल्याचे आदेश आज दिले.
  

रास्ता रोकोसह मोर्चे, निदर्शनांवर जिल्ह्यात बंदी  

यात सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणार वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबती निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना यांच्याकडून आयोजित करण्यात येणार्‍या मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, उपोषण व सर्व प्रकारच्या आंदोलनांवर सात मार्चपर्यंत निर्बंध लावण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी  दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.

जिल्हात तील सर्व धार्मीकस्थळे बंद राहणार

जिल्हात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता व सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मीक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता काही कालावधीकरिता बंद करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यात वाढ करत धार्मिक स्थळे आता सात मार्चपर्यंत बंद ठेवावित, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी शनिवारी सकाळी नव्याने जारी केले. पण धार्मीक स्थळांमध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास 05 व्यक्तींना परवानगी राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

विदर्भातील वाहतुकीस प्रतिबंध  

विदर्भातील जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणार्‍या व विदर्भात जाणार्‍या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि.27) नव्याने जारी केले आहेत.

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातून परभणीत जिल्ह्यात येणार्‍या व परभणी जिल्ह्यातून वरिल सर्व जिल्ह्यात जाणार्‍या खासगी व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस जिल्हाधिकार्‍यांनी 28 फेब्रुवारीच प्रतिबंध जारी केले होते. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असल्यामुळे आता सात मार्चपर्यंत विदर्भातील वाहतुकीस प्रतिबंध जारी करण्यात येत असल्याचे आदेश दिले असून या प्रतिबंधातून पूर्वपरवानगीने अत्यावश्यक सेवेस सूट देण्यात येईल, असेही नमूद केले आहे.




Post a Comment

0 Comments