Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शिक्षक जोडप्याने केली स्वतःच्याच दोन उच्चशिक्षित मुलींची हत्या





हैद्राबाद
➡️ तुलनेने सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चित्तूरमध्ये एका शिक्षक जोडप्याने स्वतःच्याच दोन उच्चशिक्षित तरुण मुलींचा त्रिशूळ आणि डंबेलने खून केल्याचे आरोप होतोय. यात आरोपी आई वडिलांसह त्या मृत दोन तरूणींना त्यांच्या आईवडिलांप्रमाणेच मरणानंतर पुन्हा जिवंत होण्याची अंधश्रद्धा होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. चित्तूरचे पोलिस अधीक्षक सेंथिल कुमार यांनी बुधवारी सांगितले की, अंधश्रद्धेमुळे स्वत: च्या मुलींची हत्या करणाऱ्या जोडप्यास पोलिसांनी अटक केली आहे. 

या दोन्ही आरोपी जोडप्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सेंथिल कुमार म्हणाले की, मुलींची हत्या करण्यामागील कारणांबद्दल हे जोडपे स्पष्ट आहे त्यांना कदाचित काही मानसिक समस्या असतील पण ती खूप अंधश्रद्धाळू आणि आध्यात्मिक आहेत. पालकांना त्यांच्या मुलींना वाईट आत्म्याने वेढले होते आणि त्या मुक्त होतील, अशी धारणा होती. अधिकारी म्हणाले की, आम्हाला सांगण्यात आले की त्यांच्या मुलींचेही असेच मत होते. त्यांनी पीडितांना डंबेलसारख्या वस्तूंनी मारहाण केली.

ते म्हणाले की, पालकांनी मुलींची हत्या केल्याचा आरोप आहे कारण त्यांना खात्री होती की त्या पुन्हा जिवंत होतील आणि त्यानंतर चौघे सुखी होतील. ते म्हणाले की, हा विकृत विचारसरणीचा मुद्दा आहे.आरोपींच्या मानसिक आरोग्याबद्दल विचारले असता कुमार म्हणाले की, त्यानिमित्ताने आपल्याला काही बोलण्याची इच्छा नाही. काल चित्तूर कारागृहात आरोपी आई पद्मजाची कोविड चाचणी केली जात होती, तेव्हा ती म्हणाली की, मी शिव आहे, कोरोना व्हायरस माझ्या शरीरावरुन आला आहे, चीनमधून नाही. कोरोना मार्चपर्यंत निघून जाईल. लसीची गरज नाही. तिच्या नवऱ्याने तिच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करताच ती म्हणाली, आता, तू माझा नवरा नाहीस. मी शिव आहे.

विशेष म्हणजे, कलीयुगचा अंत जवळ येणार असल्याने या उच्च शिक्षित जोडप्याने त्यांच्या दोन मुलींची आध्यात्मिक शक्तींनी पुनरुत्थान होईल या आशेने हत्या केल्याचे सोमवारी पोलिसांनी सांगितले होते. पोलिस सूत्रांनी सांगितले की या दोघांचीही आत्महत्या करण्याची योजना होती, पण पोलिस वेळेवर आल्याने तसे करू शकले नाहीत. 




Post a Comment

0 Comments