Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

वाघी बोबडे येथे बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सरपंच पदावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, 05 जखमी





💢 एकमेकाविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार 08 जणांविरुद्ध गुन्हा नोंद 

परभणी ➡️ जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील वाघी बोबडे येथे  निवडणुकीपूर्वी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती मात्र आरक्षणानंतर या गावातील सरपंच पद सर्वसाधारण गटाकडे गेल्याने दोन गटातील वाद पेटला आणि वादाचे पर्यवसान राड्यात झाले आणि बघता बघता पाच जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी बोरी पोलिसात एकमेकांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार 08 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटना 25 जानेवारी मध्यराञी घडली असल्याची माहिती पोलीस सुञाकडून मिळत आहे.

जिंतूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली आहे ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी वाघी बोबडे येथे सरपंच पद हे अनुसूचित जाती प्रवर्ग साठी पद रिक्त ठेवण्यात आले होते त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी च्या पॅनलने एकमत करत गावातील ग्रामपंचायत बिनविरोध केली होती.माञ पहिले सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीचे रद्द झाले व नवीन आरक्षण सोडत दि. 25 जानेवारीला खुल्या प्रवर्गासाठी घोषित होताच दि. 25 जानेवारीला राञीच्या सुमारास दोन्ही गटाने सरपंच पदाचे दावेदारी केल्याने या दोन गटात बाचाबाची व नंतर धारदार शस्ञाचा एकमेकाविरुद्ध वापर झाल्याने दोन्ही गटातील पाच जन जख्मी झाले त्याचे प्राथमिक उपचार बोरी ग्रामीण रूग्णालयात करूण पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवले आहे.

तर बोरी पोलीसांत  नितीन प्रतापराव बोबडे राहणार वाघी बोबडे  (25 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रदीप प्रभाकर वाघीकर, प्रभाकर बालासाहेब वाघीकर, प्रशांत प्रभाकर वाघीकर, भास्कर हरिभाऊ वाघीकर यांच्यावर कलम 307 324 323 504 34 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. दुसरी फिर्यादी प्रदीप प्रभाकर वाघीकर वरून आरोपी सचिन प्रतापराव बोबडे, प्रतापराव भगवानराव बोबडे, माऊली भास्करराव बोबडे, शिवाजी माणिक बोबडे यांच्यावर कलम 307 324 323 504 34 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला.

यामध्ये एका गटातील 03 व्यक्ती तर दुसऱ्या गटातील 02 व्यक्ती जखमी झाले असून या जखमींना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले पुढील तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड हे करीत आहे.




Post a Comment

0 Comments